रोज ५०० प्रपोजल येऊनही ती अजून ‘सिंगल’! | पुढारी

रोज ५०० प्रपोजल येऊनही ती अजून ‘सिंगल’!

मियामी : सौंदर्याचा अभाव असेल किंवा प्रेझेंटेबल नसेल तर अशा वेळी फारसे कोणाचे लक्ष वेधून घेतले जात नाही, असे अनेकदा दिसून येईल. पण, एक युवती अशीही आहे, जी म्हणते की, सौंदर्यवती असल्याने माझ्याशी कोणी संवाद साधण्यास देखील धजावत नाही आणि याचमुळे कदाचित ती आतापर्यंत सिंगल अहे.

या युवतीचे नाव आहे ज्युलियस मेडिरॉस आणि ती आहे 22 वर्षांची. फॅशन आयकॉन काईल जेनरीशी साधर्म्य असल्याने ज्युलिया ऑनलाईन खूप लोकप्रिय झाली. ली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ही युवती म्हणते की, तिला रोज डेटिंग अ‍ॅपवर रोज असंख्य प्रपोजल येतात. पण, प्रत्यक्षात यातील एकही मुलगा थेट तिच्यासमोर येऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे ज्युलियाचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स असून सोशल मीडिया व कंटेंट शेयरिंग अकाऊंटच्या माध्यमातून ती 82 लाख रुपयांहून अधिक कमाई करते. रिजेक्शनची भीती असल्याने कोणीही आपल्याकडे थेट येत नाही, असे तिचे मत आहे. आपला ड्रीम मॅन कसा असावा, याबद्दल ती अतिशय रोखठोक आहे. उत्तम उंचापुरा, यशस्वी आणि पर्यटनात स्वारस्य असणारा, असा पार्टनर हवा आहे, असे ती म्हणते.

Back to top button