पृथ्वीजवळून जाणार मोठ्या आकाराचा लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून जाणार मोठ्या आकाराचा लघुग्रह

वॉशिंग्टन : पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह जात असतात. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेमुळे पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. त्याला ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते. आता पृथ्वीजवळून आणखी एक मोठ्या आकाराचा लघुग्रह जाणार आहे.

पृथ्वीजवळून जाणार्‍या अशा अवकाशीय खगोलांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘नासा’चा एक विभाग कार्यरत असतो. आता ‘नासा’ने म्हटले आहे की 12 जूनला हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाईल. त्याला ‘488453 (1994 एक्स डी) असे नाव देण्यात आले आहे. हा या वर्षातील पृथ्वीजवळून जाणारा सर्वात मोठ्या आकाराचा लघुग्रह आहे. असे लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता अगदीच कमी असते. तरीही ’नासा’ने आता ’डार्ट’ मोहिमेतून अशा धोक्याचा सामना करण्याची उपाययोजना शोधलेली आहे. पृथ्वीला धडकण्याची शक्यता असलेल्या लघुग्रहाची एखादे यान आदळवून दिशा बदलता येऊ शकते असे या मोहिमेतून दिसून आले होते.

Back to top button