प्लास्टिक प्रदूषणामुळे दहा वर्षांत मासे संपणार? | पुढारी

प्लास्टिक प्रदूषणामुळे दहा वर्षांत मासे संपणार?

सिडनी : सध्या प्लास्टिक प्रदूषण हे अवघ्या जगाच्याच चिंतेचे कारण बनले आहे. समुद्रातील प्लास्टिक कचरा मानवासह सागरी जलचरांनाही धोकादायक बनलेला आहे. पुढील दहा वर्षांनी तर समुद्रातील मासे यामुळे संपून जातील असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण मंत्र्यांनी जगाला प्रदूषणाचा भयानक परिणाम सांगितला आहे. तान्या प्लिबरसेक यांनी आताच 2025 मधील भाकीत सांगितले आहे. त्यांनी प्रदूषणामुळे आगामी वर्षांत काय होईल याचा संकेत दिला आहे. तान्या यांच्या मते, ज्या वेगाने प्लास्टिक समुद्रात फेकले जात आहे त्यामुळे 2040 पर्यंत त्याचे एक मोठे बेट होईल. त्याचा आकार फ्रान्ससारख्या देशापेक्षा कितीतरी पटीने मोठा असेल. प्रशांत महासागरात तर प्लास्टिकचा मोठाच ढीग आहे. अनेक देश त्यांच्या पाण्यात कचरा टाकतात. समुद्रात राहणार्‍या प्राण्यांचा एकदाही विचार केला जात नाही. प्लास्टिक कधीच वितळत नाही. अशा स्थितीत ते खाल्ल्यानंतर अनेक रोगांनी ग्रासून समुद्री जीव मरतात. 2040 पर्यंत प्लास्टिकचा वापर तिप्पट वाढेल.

याचा परिणाम असा होईल की पुढील दहा वर्षांनी समुद्रातून मासे संपतील. त्याचा पर्यावरणावरही विपरीत परिणाम होणार आहे. सध्या प्रशांत म्हणजेच पॅसिफिक महासागरात सुमारे 6 लाख चौरस मैल कचरा आहे. अनेक समुद्री पक्षी त्यांना खाल्ल्यानंतर आजारी पडतात किंवा मरतात. प्लास्टिक व्यतिरिक्त, यामध्ये बाटलीच्या टोप्या, कपड्यांचे तुकडे आणि पेन शिसे यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाच्या हितासाठी आपण संवेदनशीलतेने प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे, असे तान्या प्लिबरसेक यांनी सांगितले.

Back to top button