जंगलात सापडले ‘हरवलेले’ गाव! | पुढारी

जंगलात सापडले ‘हरवलेले’ गाव!

लंडन : जगाच्या पाठीवर अशी अनेक शहरे व गावं आहेत जी एकेकाळी प्रसिद्ध आणि संपन्नही होती. काळाच्या ओघात ही गावं निर्जन झाली आणि झाडाझुडपात किंवा माती-वाळूखाली गडप झाली. आता इंग्लंडमध्येही असेच एक गाव सापडले आहे. हे गाव जंगलात जणू काही हरवूनच गेले होते. वेल्सच्या नटले व्हॅलीत हे गाव होते जे शंभर वर्षांपासून लोकांच्या नजरेपासून दूर होते.

हे गाव ज्यांनी वसलेले पाहिले होते, त्यापैकी आता कुणीही शिल्लक नाही. या गावाबाबत सध्याच्या लोकांनी केवळ कथा-कहाण्यांमधूनच ऐकले आहे. लोक म्हणाले, त्यांचे आजोबा या गावाबाबत त्यांना सांगत. असे गाव खरोखरच आहे याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. शंभर वर्षांपूर्वी या गावात अनेक कामगार राहत असत. ते सगळे खाणकाम करीत होते. मात्र, ज्यावेळी हा खाण व्यवसाय बंद पडला त्यावेळी हळूहळू या गावातून लोक बाहेर पडत गेले आणि गाव निर्जन होत गेले. आता हे गाव पुन्हा लोकांच्या नजरेत आले आहे. गावात एक स्टीम इंजिनही सापडले आहे. तसेच अन्यही काही खराब झालेली मोठी यंत्रे गावात आहेत. हे गाव पाहिल्यावर काळ जणू तिथे थबकला आहे असे वाटते. याचे कारण शंभर वर्षांपूर्वीची घरे व अन्य खुणा आता तिथे पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या
Back to top button