माणसाच्या मनातीलही ओळखणार ‘एआय’? | पुढारी

माणसाच्या मनातीलही ओळखणार ‘एआय’?

वॉशिंग्टन : सध्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. आता ऑस्टिनमधील टेक्सास युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी एक असे ‘एआय मॉडेल’ विकसित केले आहे जे आपल्या मनातील विचारही वाचू शकेल. तसेच त्यांना अनुवादितही करू शकेल! सध्या त्याला ‘सिमेंटिक डिकोडर’च्या रूपात ओळखले जात आहे.

‘नेचर न्यूरोसायन्स’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट करीत असलेले जेरी टॅग आणि यूटी ऑस्टिन यांनी चेता विज्ञान आणि कॉम्प्युटर सायन्सचे सहायक प्राध्यापक अ‍ॅलेक्स हथ यांच्या नेतृत्वाखाली हे मॉडेल विकसित केले आहे. ते ट्रान्स्फॉर्मर मॉडेल असून काही अंशी गुगल बार्ड आणि चॅटजीपीटीसारखेच आहे.

हे टूल पूर्णपणे विकसित झाले तर लकवाग्रस्त रुग्ण आणि दिव्यांगांसाठी मोठेच वरदान ठरू शकेल. जर त्याने मेंदूतील हालचाली कोड केल्या आणि मेंदूत काय सुरू आहे याची त्याच्या सहाय्याने माहिती मिळाली तर अशा अनेक लोकांना चांगली मदत होऊ शकेल. सध्या त्यावर आणखी प्रयोग केले जात आहेत.

Back to top button