नारळाच्या करवंटीपासून सक्रिय कार्बनची निर्मिती
चेन्नई : कोयम्बतूर येथील तामिळनाडू कृषी विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान विभागाच्या संशोधकांनी एक एजंटच्या रूपात कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करून नारळाच्या करवंटीपासून सक्रिय कार्बन (एसी) बनवण्यात यश मिळवले आहे. व्यापक रूपाने वापरण्यात येणारे डाय, मेलाकाईट ग्रीनसाठी त्याच्या शोषून घेण्याच्या तंत्राचा अभ्यास करण्यात आला.
मेलाकाईट ग्रीनचा वापर कागद, रेशीम आणि चामड्याच्या उद्योगात केला जातो. 'एसी' हे कार्बनचे एक उपयुक्त रूप आहे. ते विशेषतः शोषून घेणे व पाणी व गॅसच्या शुद्धीकरणासाठीच्या रासायनिक प्रक्रियांमध्ये वापरले जाते. झिंक क्लोराईड, सल्फ्युरिक अॅसिड आणि फॉस्फरस अॅसिडसारख्या अनेक रासायनिक सक्रिय एजंटांचा उपयोग करून नारळाच्या करवंटीचे एसीमध्ये रुपांतर करता येऊ शकते. अर्थात एजंटच्या रूपात कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करण्याबाबत मर्यादित संशोधन झाले.
कमी सांद्रतेवरही मेलाकाईट ग्रीन डायच्या संपर्कात आल्यावर श्वासोच्छ्वासासाठी तसेच अन्यही काही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा डायने युक्त औद्योगिक सांडपाणी ज्यावेळी जलाशयांमध्ये पोहोचते त्यावेळी ते संपूर्ण पर्यावरणालाच धोकादायक बनते. त्यामुळे त्याला शोषून घेऊन पाणी शुद्ध बनवणे हा एक चांगला उपाय आहे. 'करंट सायन्स' मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.