सर्वात विषारी आळिंबीत सापडला ‘हा’ घटक | पुढारी

सर्वात विषारी आळिंबीत सापडला ‘हा’ घटक

वॉशिंग्टन : ‘डेथ कॅप मशरूम’ हे जगातील सर्वात विषारी मशरूम म्हणून ओळखले जाते. या आळिंबीत संशोधकांना एक संभाव्य ‘अँटिडोट’ म्हणजेच प्रत्यौषध सापडले आहे. या आळिंबीतील फ्लुरेसेंट डाय या संयुगात हा औषधात वापरता येण्यासारखा विषारी घटक आढळून आला आहे.

‘इंडोसायनीन ग्रीन’ (आयसीजी) नावाच्या या डायचा वापर हृदय व यकृताचे कार्य सुरळीत चालण्यासाठीच्या वैद्यकीय उपयोगात होतो. आता संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाला असेही आढळून आले की ते डेथ कॅप मशरूममधील मूलभूत विषारी घटक असलेल्या अल्फा-अ‍ॅमेनिटीन (एएमए) लाही निष्प्रभ करू शकते.

‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्याचा प्रयोग मानवी यकृताच्या पेशींमध्ये व उंदरांमध्ये करण्यात आला आहे; पण प्रत्यक्षात मानवावर त्याची चाचणी घेण्यात आलेली नाही. डेथ कॅप मशरूमला ‘अ‍ॅमेनिटा फेलॉईडस्’ असे शास्त्रीय नाव आहे. छत्रीच्या आकाराचे हे मशरूम हिरवट पिवळ्या रंगाचे असतात. जरी हे ररूम मूळचे युरोपमधील असले तरी ते उत्तर अमेरिकेतही आढळतात.

संबंधित बातम्या
Back to top button