खोटे बोलतानाही रोबोची पापणी लवत नाही! | पुढारी

खोटे बोलतानाही रोबोची पापणी लवत नाही!

रोम : सध्याचा जमाना रोबो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करून हुबेहूब माणसासारखाच यंत्रमानव बनवण्याचा प्रयत्न सुरू असतो. असे काही रोबो बनवलेही गेले आहेत. मात्र, त्यांच्या हावभावात ते मानवाची हुबेहूब नक्कल करू शकत नाहीत असे आढळून आले आहे. विशेषतः डोळ्यात डोळे घालून बोलत असताना त्यांच्या पापण्या लवत नाहीत. खोटे बोलत असताना बहुतांश माणसांच्या पापण्या लवतात; पण अशा वेळीही रोबोच्या पापण्या लवत नाहीत! एकंदरीत डोळ्याने संवाद साधण्यात खूपच कमकुवत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इटलीच्या जेनोआ येथील इटालियन तंत्रज्ञान संस्थेत याचे एक उदाहरण समोर आले आहे. तेथे मानव-रोबो संवादादरम्यान संशोधन समूह कॉन्टॅक्टला(कॉग्निटिव्ह आर्किटेक्चर फॉर कोलॅबोरेटिव्ह टेक्नॉलॉजीज) अनेक बाबींची माहिती मिळाली. संवादादरम्यान एका संशोधक टेबलवर ड्रमसोबत रोबो आयक्यूबसमोर बसला. दोघांच्या नजरा एकमेकांवर होत्या. दोघे ड्रम वाजवत होते. संशोधकांना दिसले की, खोलीतील लोकांचे इशारे, प्रकाशझोत मध्यम-तीव्र होण्यासोबत त्याच्या पापण्या लवत नव्हत्या. रोबोची नजर थेट त्यांच्याकडे होती आणि डोळ्यात डोळे घालून संवाद करण्याच्या स्थितीत पापण्याची नैसर्गिक स्थिती दिसत नव्हती.

फिनलंडमध्ये टॅम्परे युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ हेलेना किलावुओरी यांच्यानुसार, बर्‍याचदा असे मानले जाते की, माणसाकडून लक्ष आकर्षित करताना आणि भावना व्यक्त करताना पापणी लवली जाते. चांगल्या संवादासाठी ते आवश्यक आहे. माणूस गरजेनुसार, पापणी न लवता एकाग्र राहू शकतो. डोळ्यांच्या इशार्‍याने माणूस नियमित संवाद करत आहे. त्यामुळे रोबो शास्त्रज्ञ डोळे मिचकावण्याचा मानसशास्त्रीय अभ्यास करत आहेत. यातून रोबो कशाप्रकारे स्वत:ला या स्थितीशी जुळवून घेतात हे कळते. किशोरवयीनांपासून प्रौढांपर्यंत डोळे मिचकावणारे रोबो आवडतात.

Back to top button