तीन हजार वर्षांपूर्वीच्या गव्हाच्या पिठाचा शोध | पुढारी

तीन हजार वर्षांपूर्वीच्या गव्हाच्या पिठाचा शोध

लंडन : आर्मेनियामधील पुरातत्त्व संशोधकांनी तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीच्या गव्हाच्या पिठाचा शोध लावला आहे. त्या काळात पिठापासून ब्रेड तयार करणार्‍या बेकरीचाही शोध लागला आहे. या बेकरीत अद्यापही पिठाचा ढीग असल्याचे दिसून आले.

उत्खननावेळी हा रहस्यमय, पांढर्‍या रंगाचा, भुकटीसारखा पदार्थ दिसून आल्यावर त्याबाबत अनेक कयास लावण्यात आले होते. आधी संशोधकांना ही राख असावी असे वाटले होते. मात्र, संशोधनांती हे गव्हाचे पीठ असल्याचे दिसून आले. पोलिश-आर्मेनियन पुरातत्त्व संशोधकांच्या एका टीमने पश्चिम आर्मेनियातील मेत्सामोर येथे उत्खननात ही बेकरी शोधून काढली. याठिकाणी ब्रेड बनवण्यासाठीची अनेक उपकरणेही दिसून आली व त्यावरून हे ठिकाण एका मोठ्या बेकरीचे असल्याचे समजले. एकेकाळी याठिकाणी 25 मीटर लांब व 25 मीटर रुंदीची इमारत होती. त्याठिकाणी अंदाजे 3.5 टन गव्हाचे पीठ साठवून ठेवले होते.

Back to top button