चक्क कपाळावर गोंदवले पतीचे नाव!

चक्क कपाळावर गोंदवले पतीचे नाव!

बंगळूर : प्रेमाखातर कोण, काय करील हे काही सांगता येत नाही. एरव्ही अनेक विवाहित महिला कपाळावर टिकलीच्या आकाराचे गोंदण गोंदवून घेत असतात; पण आता एका महिलेने चक्क पतीचे नावच कपाळावर गोंदवून घेतले आहे! त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सध्या टॅटूची क्रेझ आबालवृद्ध अशा सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे. 'जुनं ते सोनं' या न्यायाने ही जुनीच कला आता नव्या रूपात समोर आलेली आहे. अंगभर गोंदवून घेणारेही जगाच्या पाठीवर अनेक आहेत. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठीही अनेक सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत टॅटूचा आधार घेत असतात. आता बंगळूरच्या एका महिलेने पतीवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कपाळावर त्याचे नाव गोंदवले आहे. या टॅटूमध्ये मोठ्या अक्षरातील 'सतीश' हे नाव दिसून येते. हा प्रकार पाहून नेटकर्‍यांमधून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी हा निव्वळ मुर्खपणा असल्याचेही म्हटले. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'खरे प्रेम' असे लिहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news