

लंडन : बसचा प्रवास असो किंवा विमानाचा, आपल्याला 'विंडो सीट' म्हणजेच खिडकीजवळची जागा मिळावी, असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्याचा एक उद्देश बाहेरचा निसर्ग, अनोखी द़ृश्ये पाहायला मिळावीत हा असतो. अनेक लोक विमानातून बाहेरचे द़ृश्य कॅमेर्यातही टिपून घेत असतात. आता अशाच एका विमान प्रवाशाने रॉकेट लाँचिंगचे द़ृश्यही कॅमेर्यात टिपून घेतले आहे.
सामान्यपणे रॉकेट लाँचिंगचे जमिनीवरून टिपलेले फोटोच समोर येत असतात. आकाशातून रॉकेट लाँचिंगचा टिपलेला व्हिडीओ क्वचितच समोर येतो. आता इन्स्टाग्रामवर असाच व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत असताना दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की ज्यावेळी तुम्ही विमानात असता आणि त्याचवेळी योगायोगाने रॉकेट लाँच करण्यात आलं तर? अर्थातच हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आतापर्यंत तो 70 लाख लोकांनी पाहिला आहे. तसेच 7 लाख लोकांनी त्याला लाईकही केले आहे. अनेक लोकांनी त्यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या व्हिडीओत दिसते की समुद्रकिनारी असलेल्या लाँच पॅडवरून एक रॉकेट लाँच केले जात आहे. हे रॉकेट आकाशात वर उंच उडत असताना त्यामध्ये दिसून येते. फेब—ुवारीमध्ये हा व्हिडीओ सर्वप्रथम शेअर करण्यात आला होता.