चंद्रावर ‘वाय-फाय’ सुरू करण्याच्या प्रयत्नात ‘नासा’

चंद्रावर ‘वाय-फाय’ सुरू करण्याच्या प्रयत्नात ‘नासा’

वॉशिंग्टन : चंद्राला पृथ्वीचा 'उपग्रह' म्हणून ओळखले जाते. सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपली 'पृथ्वी' आणि 'थेया' नामक ग्रह यांच्यात झालेल्या धडकेने निर्माण झालेल्या अवशेषांतून चंद्राचा जन्म झाला. एका अंदाजानुसार चंद्राचे वजन सुमारे 81 अब्ज टन इतके असून त्याचा आकार गोल नसून अंडाकार आहे. अशा या चंद्रावर 'वाय-फाय' सुरू करण्याची तयारी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' करत आहे.

चंद्रावर 'वाय-फाय' सुरू करण्याच्या तयारीत 'नासा' असल्याची माहिती एका अभ्यासातून पुढे आली आहे. 'नासा'च्या 'ग्लेन रिसर्च सेंटर'चे संचालक मैरी लोबो यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की,

आर्टेमिसच्या माध्यमातून चंद्रावर अंतराळयात्रींना पाठविण्यासाठी व पृथ्वीवर राहण्यासंबंधीच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चंद्रावर वाय-फाय सुरू करण्यासंबंधीचे हे संशोधन 'नासा'च्या 'कॅम्पास लॅब'मध्ये करण्यात आले. यासंदर्भात लॅबचे स्टिव्ह ओल्सन यांनी सांगितले की, आर्टेमिस बेसकॅम्पशी संबंधित क्रू, रोव्हर्स, विज्ञान आणि खणणार्‍या उपकरणांशी संपर्क साधण्यासाठी चांगल्या संपर्क प्रणालीची गरज भासते. यामुळेच चंद्रावर वाय-फाय सुरू करता येईल का, यासाठी संशोधन सुरू आहे.

'नासा'कडून सध्या लवकरच नवी चांद्र मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर स्थायी 'क्रू स्टेशन'ची निर्मिती करण्याचा प्रयत्न होणार आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुव या थंड ठिकाणावर गोल्फ कोर्टच्या आकाराचा रोबो पाठवण्यात येणार आहे. याचे नाव 'वायपर' असे असेल. ते चंद्रावर किमान 100 दिवस राहून तेथील जलस्रोत शोधणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news