शास्त्रज्ञांनी निर्माण केले ब्रह्मांडातील नीचांकी तापमान | पुढारी

शास्त्रज्ञांनी निर्माण केले ब्रह्मांडातील नीचांकी तापमान

बर्लिन : जगातील सर्वात कमी तापमानाचे ठिकाण म्हणून अंटार्क्टिका येथील ‘वोस्तोक’ स्टेशनची ओळख आहेे. येथे रक्त गोठविणारी थंडी पडते. येथील पारा उणे 89 अंश सेल्सियसपर्यंत घसरतो. मात्र, शास्त्रज्ञांनी यापेक्षाही थंड तापमान तयार करण्याचा विक्रम नोंदविला. त्यांनी पृथ्वीवरच ब्रह्मांडातील 273.15 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची निर्मिती केली.

तापमान कमी करण्याचे अशक्यप्राय वाटणारे हे आव्हान शास्त्रज्ञांनी जमिनीत 393 फूट खोलीवर एक टॉवर लावून पूर्ण केले. इतक्या खोल जमिनीखाली हे काम करण्याचे मुख्य कारण म्हणजे हा प्रयोग करताना प्रयोगशाळेत असणारे शास्त्रज्ञ आणि उपकरणांचा तापमानावर परिणाम होऊ नये. हे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन ‘फिजिक्स रिव्ह्यू लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

अंटार्क्टिकामधील ‘वोस्तोक’ हे पृथ्वीवरील सर्वात थंड स्थान आहे. तर ब्रह्मांडातील सर्वात कमी तापमान बूमरँग नेब्यूला येथे आहे. हे ठिकाण पृथ्वीपासून पाच हजार प्रकाशवर्षे दूर आहे. येथील सरासरी तापमान उणे 272 अंश सेल्सिअस म्हणजे एक केल्विन इतके असते. मात्र, शास्त्रज्ञांनी यापेक्षाही कमी तापमान पृथ्वीवर तयार केले.

ब्रह्मांडातील कमी तापमानाचा हा प्रयोग जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. हे शास्त्रज्ञ बोस-आईनस्टाईन कॉन्डेसेट (बीईसी) क्वांटम प्रॉपर्टीवर संशोधन करत होते. बीईसीला पदार्थाचे पाचवे ‘स्टेट’ म्हणूनही ओळखले जाते. हा अत्यंत कमी तापमानात राहणारा गॅसिय पदार्थ आहे. यामध्ये कोणतीही वस्तू एखाद्या मोठ्या पदार्थासारखा व्यवहार करू लागतो.

हा पदार्थ इतका थंड असतो की हाडेही गोठू लागतात. उणे 273.15 अंश सेल्सिअस तापमान मोजण्यासाठी केल्विन स्केल तयार केले. इतक्या तापमानात कोणतीही वस्तू केवळ 17 सेकंदांपर्यंत राहू शकते.

Back to top button