राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी दिसली गूढ आकृती? | पुढारी

राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी दिसली गूढ आकृती?

लंडन : ब्रिटनमध्ये नुकतंच वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर ब्रिटनच्या राजघराण्याचा मुकुट चढवण्यात आला. यावेळी राजघराण्यातील सर्व सदस्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. या सोहळ्याच्या एका व्हिडीओत एक काळी सावली दिसल्याने चर्चेला ऊत आला. अखेर त्याचाही खुलासा झालाच!

संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरलेल्या या प्रसंगाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आलं होतं. विविध देशांमधून विविध वेळांवर हे प्रक्षेपण पाहिलं गेलं. त्या क्षणाचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही त्यानंतर लगेचच व्हायरल करण्यात आले. एका राजाचा राज्याभिषेक कसा होतो हे लक्षपूर्वक पाहात असतानाच एकाला नव्हे, तर बर्‍याच नेटकर्‍यांना असं काहीतरी दिसलं की, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जोई ग्रीन या ट्विटर अकाऊंटवरून राज्याभिषेक सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

त्याच्या कॅप्शनमध्ये युजरनं लिहिलं, इतर कोणीसुद्धा वेस्टमिंस्टर अ‍ॅबीमध्ये ‘ग्रिम रीपर’ पाहिला का? नेटकर्‍याचा हा प्रश्न पाहून तातडीनं त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओकडे सर्वांच्या नजरा वळल्या. हा व्हिडीओ प्ले करून पाहिलं तर काय… अनेकांनाच त्यात संपूर्ण काळ्या रंगाची, हातात काठीसद़ृश वस्तू असणारी सावली दिसली. ही सावली नसून, खुद्द काळच असल्याचं म्हणत मृत्यूशी नातं जोडल्या जाणार्‍या ग्रिम रीपरचा संदर्भ तिथं देण्यात आला. अर्थातच ती आकृती म्हणजे ‘मृत्यू’ वगैरे काही नव्हता. याबाबत थेट वेस्टमिंस्टर अ‍ॅबीशी संलग्न व्यक्तींनी खुलासा केला. ही व्यक्ती इंग्लंडच्या धर्मपीठाची अधिकारी अर्थात ‘व्हर्जर’ असल्याचं सांगण्यात आलं.

Back to top button