म्युझियममध्ये हवा आहे सफाई कामगार! पात्रता किमान ग्रॅज्युएट! | पुढारी

म्युझियममध्ये हवा आहे सफाई कामगार! पात्रता किमान ग्रॅज्युएट!

मँचेस्टर : आजच्या घडीला नोकर्‍यांची संख्या कमी झाली आहे. अनेक स्टार्टअप सुरु झाले असले तरी प्रतिकुल चित्र आहे. लंडनमध्ये मात्र अनोखी व्हॅकन्सी निघाली असून या एका पोस्टसाठी हजारपेक्षाही अर्ज आले आहेत.

मँचेस्टर युनायटेडने एक अशी व्हॅकन्सी काढली असून त्यात त्यांना संघाने जिंकलेल्या ट्रॉफी ठेवण्यासाठी कुशल सफाई कामगाराची आवश्यकता आहे. मँचेस्टर युनायटेड संघाने जिंकलेले सर्व चषक एका कॅबिनेटमध्ये ठेवले गेले असून या चषकांची साफसफाई करणे, हे या कामगाराचे एकमेव काम असणार आहे. आता ही नोकरी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे साफसफाई करणे इतकेच काम असले तरी यासाठी मँचेस्टर युनायटेड व्यवस्थापनाने लागू केलेली शिक्षणाची अट!

साफसफाईच्या या व्हॅकन्सीला अनुसरून अर्ज करायचा असेल तर उमेदवाराने किमान ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. ओल्ड ट्रॅफोर्ड येथे स्थित या म्युझियममध्ये अगणित चषक असून साफसफाईबरोबरच आवश्यकतेनुसार या चषकांचे बॉक्समध्ये पॅकिंग करणेही आवश्यक असेल, असे यावेळी जाहीर केले गेले. याशिवाय, या सफाई कर्मचार्‍याला फोटोग्राफीचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. मँचेस्टर युनायटेड हा फुटबॉल क्लब असल्याने उमेदवाराला फुटबॉलमध्ये इंटरेस्ट असावा, ही मँचेस्टर व्यवस्थापनाची आणखी एक माफक अपेक्षा!

Back to top button