ट्यूमरचा छडा लावण्यासाठी नवे उपकरण विकसित | पुढारी

ट्यूमरचा छडा लावण्यासाठी नवे उपकरण विकसित

चेन्नई : ‘ग्लियोब्लास्टोमा’ हा मेंदू आणि मणक्याच्या हाडामध्ये आक्रमकपणे वाढणारा ट्यूमर आहे. आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी मशिन लर्निंगवर आधारित नवे कम्प्युटेशनल उपकरण विकसित केले आहे जे मेंदू व मणक्याच्या हाडात कर्करोग उत्पन्न करणार्‍या अशा ट्यूमरचा अचूक छडा लावते.

हा ट्यूमर अतिशय घातक स्वरूपाचा असतो. प्रारंभिक निदानानंतर दोन वर्षांपेक्षाही कमी आयुष्य रुग्णाला मिळू शकते. तसेच त्यावरील उपचारासाठी अतिशय मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या ट्यूमरवर अनेक प्रकारची संशोधने झाली आहेत. त्याच्यावरील उपचारात सुधारणा होण्यासाठी ‘ग्लियोब्लास्टोमा’मध्ये समाविष्ट प्रोटिन रूपांमधील ड्रायव्हर (रोगजनक) म्युटेशनची ओळख करण्यासाठी कार्यात्मक परीक्षण परिणामकारक ठरू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. नवे कम्प्युटेशनल उपकरण ‘जीबीएम ड्रायव्हर’ (ग्लियोब्लास्टोमाम्यूटिफार्म ड्रायव्हर्स) ला विशेष रूपाने ग्लियोब्लास्टोमामध्ये ड्रायव्हर म्युटेशन आणि पॅसेंजर म्युटेशनच्या (पॅसेंजर म्युटेशन तटस्थ म्युटेशन असते) ओळखीसाठी विकसित करण्यात आले आहे.

‘जीबीएम ड्रायव्हर’ची एक प्रमुख विशेषता ही आहे की त्याला ऑनलाईनही पाहता येऊ शकते. या वेब सर्व्हरला विकसित करण्यासाठी अमिनो अ‍ॅसिडचे गुण, द्वी-पेप्टाईड आणि त्री-पेप्टाईड रूपांकन, संरक्षण स्कोअर आणि विशिष्ट स्कोरिंग मॅट्रिक्ससारख्या अनेक कारकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की हे उपकरण ग्लियोब्लास्टोमामध्ये ड्रायव्हर म्युटेशनचा छडा लावता येऊ शकतो तसेच संभाव्य चिकित्सीय लक्ष्यांना ठरवण्यासाठीही मदत होऊ शकते.

Back to top button