साडेपाचशे मुलांचा बाप! 90 लाखांचा दंड! | पुढारी

साडेपाचशे मुलांचा बाप! 90 लाखांचा दंड!

अ‍ॅमस्टरडॅम : पैसे कमावण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात आणि एकदा यामागे लागले की, ते नैतिक, सामाजिक, कायदेशीर भानही सोडून देतात. पैशाची हाव असणारे लोक मग त्यासाठी अगदी काहीही करतात. पण, एकवेळ अशी येते की, ते खूप मोठ्या अडचणीत सापडतात. नेदरलँड्समधील एक व्यक्ती असाच कायदेशीर अडचणीत सापडला असून आश्चर्य वाटेल; पण त्याच्यावर दोषारोप हा आहे की, तो चक्क 550 मुलांचा बाप आहे!

जोनाथन मेयर असे या 41 वर्षीय अवलियाचे नाव असून, तो नेदरलँडमधील स्पर्म डोनर आहे. जोनाथन स्पर्म डोनर असल्याने प्रत्यक्ष रूपाने नव्हे, तर अप्रत्यक्ष रूपाने तो 550 मुलांचा बाप आहे. डेली स्टार न्यूज वेबसाईटने दिलेल्या या वृत्तानुसार, एका कोर्टाने त्याला आता आणखी मुलांचा बाप होता येणार नाही, असे प्रतिबंध जाहीर केले आहेत. आता पुन्हा स्पर्म डोनेट केले तर 90 लाख रुपये दंड भरावा लागेल, अशी सक्त ताकीददेखील न्यायालयाने यावेळी दिली आहे.

नेदरलँड्समध्ये स्पर्म डोनेट करून बक्कळ पैसा कमावला जातो. पण, या देशातील नियमानुसार, कोणताही पुरुष स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून 25 मुलांचा बाप होऊ शकतो. जोनाथनने मात्र या नियमांची अक्षरश: ऐसीतैसी केली असून, यामुळे नेदरलँड्सने त्याचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये घातले आहे.

Back to top button