सर्वाधिक सिम कार्डबाबतीत मकाऊ आघाडीवर! | पुढारी

सर्वाधिक सिम कार्डबाबतीत मकाऊ आघाडीवर!

नवी दिल्ली : आकडे आपल्याला अनेकदा आश्चर्याचे धक्के देतात. शिवाय, ते आपली विचारांची पद्धत आणि आपला अंदाज हे देखील सपशेल उधळवून लावतात. आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन दिसत असला तरी आकडेवारी काही वेगळेच चित्र दर्शवते. एका सर्व्हेनुसार, प्रत्येक 100 व्यक्तीमागे सर्वाधिक सिम कार्डच्या निकषावर इंडोनेशिया व नायजेरियाच्या तुलनेत भारत पिछाडीवर आहे.

प्रत्येक 100 व्यक्तींमागे भारतात 82 सिम कार्ड असतात, असे आकडेवारी सांगते. इराणमध्ये 100 व्यक्तींमागे 155, दक्षिण कोरियात 100 व्यक्तींमागे 141 तर इंडोनेशियात 100 व्यक्तींमागे 134 सिम कार्ड असतात, असे यात नमूद आहे. हेच प्रमाण स्वीडनमध्ये 123, चीनमध्ये 122 तर स्पेनमध्ये 120 इतके आहे. इटलीत 132, अर्जेंटिनात 130, जर्मनीत 128 व डेन्मार्कमध्ये असे प्रमाण आहे.

सध्या प्रत्येक व्यक्तींमागे सर्वाधिक सिमकार्ड मकाऊत आहे. हाँगकाँगप्रमाणे मकाऊ चीनचे विशेष प्रशासनिक क्षेत्र आहे. मकायूमध्ये 100 व्यक्तींमागे सर्वाधिक 413 सिम कार्ड असतात. या यादीत हाँगकाँग 319 सिमसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीनुसार, इंग्लंडमध्ये प्रत्येक 100 व्यक्तींमागे 119, फ्रान्समध्ये 113, नॉर्वेत 108, ऑस्ट्रेलियात 105, ब—ाझीलमध्ये 102, नायजेरियात 91, कॅनडात 86, अफगाणमध्ये 58 तर सुदानमध्ये 37 इतके सिमकार्ड असतात, असे दिसून आले आहे. प्रत्येक 100 व्यक्तींमागे सर्वात कमी सीम उत्तर कोरियात दिसून आले असून तेथे हे प्रमाण 23 इतके अत्यल्प राहिले आहे.

या यादीत भारत बर्‍याच तळाच्या स्थानी आहे. या यादीत अमेरिका 195 सिमसह तिसर्‍या स्थानी तर रशिया 169 सीमसह चौथ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेत हा आकडा 169 इतका आहे तर जपानमध्ये 100 व्यक्तींमागे 161 सीमकार्ड असतात, असे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Back to top button