

ऑक्सफर्ड : 2022 मध्ये गोबलिन मोड या शब्दाची ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून निवड झाली. पण वर्षातील सर्वोत्तम शब्द डिक्शनरीत कसा निवडला जातो, याचा आपण कधी विचारही केला नसेल. अलीकडेच ऑक्सफर्ड लँग्वेजच्या प्रमुखांनी या वर्षातील शब्द निवडीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
मागील पाच वर्षांत गोबलिन मोड, वॅक्स, क्लायमेट इमर्जन्सी, टॉक्सिक अशा शब्दांची मागील पाच वर्षांच्या कालावधीत निवड करण्यात आली. या शब्दांची निवड कशी केली जाते, याची माहिती देताना कॅस्पर ग्रँथल म्हणाले, प्रत्येक वर्षी कोशकारांची एक टीम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये एकत्रित येते आणि वर्षातील ऑक्सफर्ड शब्दाची निवड केली जाते. कोणत्या शब्दाचा वर्षभरात बराच उपयोग केला गेला, याची यावेळी शहानिशा केली जाते. अशा 35 ते 40 शब्दांची निवड केली जाते आणि त्यानंतर ऑक्सफर्ड कर्मचार्यांची मतेही आजमावली जातात.
अगदी अलीकडे थेट निष्कर्षावर येण्याऐवजी नागरिकांमधूनही सर्व्हे घेण्यात आला आणि तीन शब्दांमधून कोणत्याही एका शब्दाला पसंती देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यात ज्या शब्दाला सर्वाधिक पसंती मिळाली, त्या शब्दाचा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केला गेला.
2022 मधील वर्ल्ड ऑफ द इयर गोबलिन मोड
यापूर्वी 2022 मध्ये जागतिक स्तरावरून मिळालेल्या 3 लाख 18 हजार मतांच्या माध्यमातून गोबलिन मोड हा शब्द वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून समाविष्ट करण्यात आला. सुस्त राहण्याच्या प्रक्रियेला गोबलिन मोड असे ओळखले जाते. गोबलिन मोड शब्द सर्वप्रथम ट्विटरवर 2009 मध्ये वापरला गेला आणि फेब्रुवारी 2022 मध्ये सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. याशिवाय, 2018 मध्ये टॉक्सिक तर 2019 मध्ये क्लायमेट इमर्जन्सी या शब्दांची निवड केली गेली. पुढे 2020 मध्ये ऑक्सफर्डने प्रथमच कोणताही शब्द निवडला नव्हता.