ऑस्टियोआर्थरायटिसवर इंजेक्शनची नवी थेरपी | पुढारी

ऑस्टियोआर्थरायटिसवर इंजेक्शनची नवी थेरपी

न्यूयॉर्क : वैज्ञानिकांनी ऑस्टियोआर्थरायटिसवरील उपचारासाठी इंजेक्शनद्वारे दिली जाणारी नवी सेल थेरपी विकसित केली आहे. या थेरपीने सूज कमी होते तसेच कार्टिलेजचा पुन्हा विकास होतो.

ऑस्टियोआर्थरायटिसमुळे जगभरात 52 कोटींपेक्षाही अधिक लोक ग्रस्त आहेत. त्यांना या आजारामुळे वेदना आणि सूज यांचा त्रास सहन करावा लागतो. सांध्यांमध्ये एखाद्या दुखापतीमुळे उपअस्थी म्हणजेच कार्टिलेज क्षतिग्रस्त झाल्याने ही समस्या निर्माण होते. तिला नैसर्गिकरीत्या सुधारता येत नाही. अमेरिकेतील वेक फॉरेस्ट इन्स्टिट्यूट फॉर रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या संशोधिका जोहन्ना बोलांडर यांनी सांगितले की, ‘ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये नेमकी कोणती समस्या असते, हे आम्ही पाहिले. त्याची तुलना आम्ही सामान्य स्थितीशी केली आणि एक इम्युनोथेरपी सेल म्हणजेच पेशींवरील उपचार पद्धती विकसित केली. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button