एका श्वासात केला ‘हा’ विश्वविक्रम! | पुढारी

एका श्वासात केला ‘हा’ विश्वविक्रम!

कोपेनहेगन : जगात अनेक प्रकारचे विश्वविक्रम झालेले आहेत व त्यांची गिनिज बुकमध्ये नोंदही झालेली आढळते. काही विक्रम तर अगदीच ‘हट के’ असेच असतात. डेन्मार्कमधील एका व्यक्तीनेही असाच एक विक्रम केलेला आहे. त्याने पाण्यात एकाच श्वासात 662 फूट 8.7 इंच पाण्याखाली पोहून हा विक्रम केला. त्यासाठी त्याने तब्बल 2 मिनिटे 42 सेकंदांपर्यंत आपला श्वास रोखला होता!

या माणसाचे नाव स्टिग असे आहे. त्याने लहान मुलांना प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम केला. तो महासागरांची सुरक्षा आणि वन्यजीवांच्याही सुरक्षेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने स्टिगच्या या उपक्रमाचा तीन मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. स्टिगने बराच वेळ श्वास रोखून पोहण्याचा सराव केला होता. त्यानंतर 2020 मध्ये त्याने हा विक्रम केला. त्याने सांगितलेकी या डाईव्हचा हा व्हिडीओ आजही लोक पाहतात आणि त्याचे कौतुक करतात. स्टिगने बर्फाच्या स्तराखाली असलेल्या पाण्यात पोहोण्याचाही उपक्रम केला होता.

Back to top button