पाणी असलेल्या बाह्यग्रहाचा संशोधकांनी लावला शोध

पाणी असलेल्या बाह्यग्रहाचा संशोधकांनी लावला शोध

वॉशिंग्टन : वैज्ञानिक दीर्घकाळापासून पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. खडकाळ किंवा ठोस पृष्ठभाग, तार्‍यापासूनच योग्य अंतर (योग्य तापमानासाठी) आणि पाणी या तीन गोष्टींच्या निकषावर अनेक ग्रहांचा अभ्यास केला जात असतो.

आता संशोधकांना आपल्या सौरमालिकेबाहेर एका अशा ग्रहाचा शोध लागला आहे ज्यावर द्रवरूप पाण्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे तिथे जीवसृष्टीही आहे का याबाबतचे कुतुहल निर्माण झाले आहे.

'एल 98-59' या तार्‍याभोवती फिरणारा हा ग्रह आहे. त्या ग्रहावर पाणी विखुरलेले असल्याने त्यावर जीवांचे अस्तित्व असावे असे संशोधकांना वाटत आहे. हा ग्रह 2019 मध्ये ट्रांझिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट (टीईएसएस) च्या शोधात सापडलेल्या तीन ग्रहांपैकी एक आहे. त्याचे वस्तुमान शुक्र ग्रहाच्या तुलनेत निम्मे आहे. रेडियल वेलोसिटी तंत्राचा वापर करून या ग्रहाचे निरीक्षण केल्यावर आढळले की तो आतापर्यंत आढळलेला आकाराने सर्वात लहान बाह्यग्रह आहे.

'एल 98-59' हा तारा पृथ्वीपासून 35 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. अफाट पसरलेल्या अंतराळाचा विचार करता हे अंतर तुलनेने कमी आहे. ग्रहांच्या वस्तुमानाचा छडा लावण्यासाठी 'व्हेरी लार्ज टेलिस्कोप'ने रेडियल वेलोसिटी तंत्राचा वापर केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news