अटलांटिक महासागरात आढळली किलर व्हेलची नवी प्रजाती

अटलांटिक महासागरात आढळली किलर व्हेलची नवी प्रजाती

वॉशिंग्टन : अमेरिकेजवळ अटलांटिक महासागरात किलर व्हेलची नवी प्रजाती आढळली आहे. हे मासे डॉल्फिन आणि विशाल सीलसारख्या जलचरांची शिकार करतात. अमेरिकेच्या अटलांटिक महासागरातील पश्चिम तटाजवळ या किलर व्हेलना पाहण्यात आले. कॅनडाच्या संशोधकांनी या खतरनाक व्हेलला 'आऊटर कोस्ट ट्रॅन्शन्ट व्हेल' असे नाव दिले आहे. ही व्हेल करड्या रंगाच्या छोट्या व्हेलचीही शिकार करते हे विशेष!

नव्या प्रजातीचे किलर व्हेल हे खोल समुद्रात शिकार करणे पसंत करतात. ती किनारपट्टीजवळ क्वचितच शिकार करते. विशेष म्हणजे या व्हेलची स्वतःची एक वेगळी भाषा आहे आणि हे संकेत अशा व्हेलच्या समूहाचा एक भाग असतो असे मानले जाते.

आग्नेय अलास्कापासून दक्षिण कॅलिफोर्नियापर्यंत आढळणारे किलर व्हेल हे एकाच प्रजातीचे असतात असे दीर्घकाळापासून मानले जात होते. मात्र, आता या जलचरांमध्येही वेगळी प्रजाती असल्याचे दिसून आले. ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

तेथील एक विद्यार्थी संशोधक जोश मॅकइन्नेस यांनी सांगितले की किलर व्हेल संपूर्ण जगभरात प्रत्येक ठिकाणी आढळतात. ते किनारपट्टीजवळच बहुतांश काळ असतात असे दिसून येते. मात्र, किलर व्हेलची ही नवी प्रजाती किनार्‍यापासून दूर व खोल समुद्रात असते. नव्या प्रजातीच्या बहुतांश किलर व्हेल या ओरेगॉनपासून मध्य कॅलिफोर्नियापर्यंतच्या समुद्रात दिसून आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news