beautiful women : हुंजा खोर्‍यातील स्त्रिया अधिक सुंदर! | पुढारी

beautiful women : हुंजा खोर्‍यातील स्त्रिया अधिक सुंदर!

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील हुंजा व्हॅली अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील लोकांचे दीर्घायुष्य, निसर्गाशी समरस होऊन जगणं, त्यांचे उतारवयातही टवटवीत राहणारे तारुण्य याची जगभर चर्चा होत असते. अत्यंत निसर्गसंपन्न असलेल्या या खोर्‍यातील स्त्रियांचे सौंदर्यही चर्चेचा विषय असतो. याठिकाणी बुरुशो नावाच्या समुदायाचे लोक अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. या समुदायाचे वैशिष्ट्य असे आहे की, या समाजातील महिला असोत वा पुरुष अधिक वर्षे जिवंत राहतात. इतकेच नव्हे तर त्यांचे सौंदर्यही दीर्घकाळ अबाधित राहते. वयाच्या 60 व्या वर्षीही इथल्या महिला तिशीतील दिसतात आणि वयाच्या 90 व्या वर्षीही इथले पुरुष पिता होऊ शकतात! तसेच या खोर्‍यातील महिला जगातील बाकी महिलांच्या तुलनेत वयाच्या 50 वर्षानंतरही आई होऊ शकतात.

हुंजा खोर्‍यातील बुरूशो समाजातील लोकांची जगण्याची पद्धत अर्थात जीवनशैली खूपच वेगळी आहे. महिला आणि पुरुष हे दोघेही शारीरिक आणि मानसिक स्वरूपात मजबूत असून निसर्गाचा यात महत्त्वाचा वाटा आहे. दीर्घायुष्याचे रहस्य हे त्यांच्या राहण्यात दडलेले आहे. हुंजा वॅलीमध्ये राहणारा हा समुदाय पहाटे 5 वाजताच उठतो. त्यानंतर मॉर्निंग वॉक आणि दिनक्रम, त्यातील कामे यामध्ये व्यस्त राहतो. तसेच कोणतेही जंकफूड, तेलकट खाणे नसल्यामुळे सौंदर्यात बाधा येत नाही. मुख्यत्वे दिवसातून केवळ दोनच वेळा हे लोक खातात. सतत खाणे यांना मान्य नाही. त्यामुळे चेहर्‍यावर अथवा आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. बुरूशो समाजातील लोक हे प्रोसेस्ड फूड न खाता पांरपरिक खाण्याला अधिक महत्त्व देतात. तसेच नैसर्गिक पदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य टिकविण्याकडेच यांना भर दिसून येतो.

शेतातील पिकणार्‍या पदार्थांवरही कीटकनाशके फवारणे त्यांना योग्य वाटत नाही आणि त्यामुळेच सर्व नैसर्गिक ताज्या गोष्टींचा वापर केल्याने दीर्घायुष्य मिळण्यास आणि नैसर्गिक सौंदर्य टिकण्यास मदत मिळते. हुंझा खोर्‍यात वितळणार्‍या हिमनदीतील पाण्यात नैसर्गिक खनिजे आणि अँटिऑक्सिडंटस् अधिक प्रमाणात असतात. तसेच यामध्ये कोणत्याही रसायनयुक्त गोष्टींची भेसळ नसते. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य अधिक टिकते.

Back to top button