समुद्रकिनारी आढळला एलियन्ससारखा जीव | पुढारी

समुद्रकिनारी आढळला एलियन्ससारखा जीव

लंडन : एलियन्स आहेत की नाहीत, यावर दीर्घकाळापासून चर्चा सुरू?आहे. काही लोकांच्या मते, पृथ्वीवर ज्याप्रमाणे लोक राहतात, त्याप्रमाणे ब्रह्मांडातील अनेक ग्रहांवर एलियन्स राहतात. मात्र, यामध्ये किती तथ्य आहे, याबाबत कोणीच काही ठोसपणे सांगू शकत नाही. काहीवेळा पृथ्वीवर असे काही चित्रविचित्र जीव दिसून येतात, ते पाहून एलियन्ससारखा जीव आढळला, असेही म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वी युनायटेड किंगडममधील एका बीचवर एक ब्रिटिश महिला फिरण्यास गेली असता, तिच्या नजरेस अत्यंत विचित्र असा सागरी जीव पडला. या जीवाला पाहून ती प्रचंड घाबरली. सध्या याच जीवाचे छायाचित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. या जीवाला ओळखण्यासाठी विशेषज्ञ प्रयत्न करू लागले. यातील काही लोक यामध्ये अपयशी ठरले; तर काही मरिन तज्ज्ञांच्या मते, हा जीव नेमका कोणता आहे? हे सांगणे अत्यंत अवघड आहे.

सुमारे 72 वर्षीय मेरेलिन ही महिला यूकेच्या टिटिलहॅम्पटन येथील समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारत होती. तेव्हा तिच्या नजरेस हा अनोखा सागरी जीव पडला. या जीवाला काटेदार शेपूट, तर पारदर्शी डोके होते. हा जीव अगदी एलियन्ससारखा दिसत असल्याने तिने त्याचे अनेक फोटो काढले.

संबंधित बातम्या

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले छायाचित्र पाहून हा जीव अत्यंत विचित्र वाटतो. धड तो मासाही वाटत नाही; कारण तो माशासारखा जराही वाटत नाही. उल्लेखनीय म्हणजे, तेथील अनेक मच्छीमारांनी आपण आपल्या हयातीत असा अनोखा जीव पाहिला नसल्याचे सांगितले. असाच एक जीव गेल्या डिसेंबरमध्ये दिसून आला होता. मरिन कन्झर्व्हेशन सोसायटीच्या मते, हा जीव रे फिश प्रजातीचा असू शकतो.

Back to top button