काळे बटाटेही असतात हे तुम्हाला माहिती आहे का? बिहारमध्ये गया जिल्ह्यात तसेच उत्तर प्रदेशातही अशा बटाट्याची शेती केली जाते.
हे बटाटे वरून काळ्या रंगाचे आणि आतून जांभळट रंगाचे असतात. या बटाट्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. सामान्यपणे हे बटाटे पाचशे रुपये किलो या दराने विकले जातात. मात्र, त्याच्यामधील औषधी गुणांचेही महत्त्वही तितकेच आहे. या बटाट्यातील हे काही गुण…
काळ्या बटाट्यात अँटिऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.
हृदयाच्या आरोग्यासाठी काळे बटाटे गुणकारी ठरतात. त्यांच्यामध्ये फायबर, मँगेनीज, कॉपरसारखे पोषक तत्त्व असतात जे रक्ताची गुठळी तसेच हार्ट अॅटॅकपासून बचाव करतात.
शरीरातील सूज कमी करण्यासाठीही काळे बटाटे गुणकारी आहेत. अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असल्याने कर्करोगापासून शरीराचा बचाव करण्यासाठीही हे बटाटे लाभदायक ठरतात. काळ्या बटाट्याच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट अॅटॅकसारख्या समस्या कमी होतात.
काळा बटाटा यकृतासाठीही लाभदायक आहे. यकृताला 'डिटॉक्सीफाय' करण्यासाठी हा बटाटा उपयुक्त ठरतो. या बटाट्याच्या सेवनाने रक्तामधील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात. काळ्या बटाट्यात फॅट तसेच कॅलरीज अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांच्या सेवनाने आपले वजन नियंत्रित राहते. काळ्या बटाट्यात फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारण्यासाठी त्याचा लाभ होतो. काळ्या बटाट्यात 'सी' जीवनसत्त्व असते. त्यामुळे त्वचा व केसांना लाभ मिळतो.