‘आयपीएस अ‍ॅड्रेस’वर चालणारे उपकरण

‘आयपीएस अ‍ॅड्रेस’वर चालणारे उपकरण
Published on
Updated on

भोपाळ : बुंदेलखंडमधील सागरमध्ये इलेक्ट्रिकल ट्रेडमधून आयटीआय करणार्‍या तरुणाने आयपीएस अ‍ॅड्रेसवर चालणारे उपकरण तयार केले आहे. ते उपकरण फोनमध्ये बसवले तर दुसर्‍याचे बोलणे सहज ऐकू येते. तसेच त्याच्या आजूबाजूला किती लोक आहेत, कोण कोण आहेत आणि काय बोलत आहेत, त्यांची नावे, नंबर, पत्ते हे सगळे सहज अगदी काही मिनिटांत उपलब्ध होत असल्याचा या तरुणाचा दावा आहे.

या तरुणाने सागर पोलिसांच्या अधिकार्‍यांना या उपकरणाचा डेमोही दाखवला आहे. हे उपकरण बनवणार्‍या तरुणाचे म्हणणे आहे की, सध्या जीपीएस तंत्रज्ञानावर काम केले जाते, मात्र भविष्याचा विचार करून त्यांनी हे सॉफ्टवेअर आयपीएस तंत्रज्ञानावर विकसित केले आहे. गुन्हेगारांना पकडण्यात हे उपकरण पोलिस आणि लष्करासाठी खूप प्रभावी ठरू शकते, असा दावा या तरुणाने केला आहे.

सागरचे रहिवासी मुकेश कुमार यांनी सांगितले की, होम थिएटरमध्ये सीपीयू कॅमेरा आणि इतर गोष्टी बसवण्यात आल्या आहेत. आयपी अ‍ॅड्रेसवर मोबाईलसारखे दुसरे उपकरण तयार केले आहे, जे त्याला जोडलेले आहे. इंटरनेटद्वारे हे उपकरण चालू होताच, 100 मीटरच्या परिघात असलेल्या सर्व मोबाईल फोनचा डेटा त्यात अ‍ॅक्सेस होतो.

यासाठी त्यांनी मेमरी कार्डही बसवले आहेत. एका मेमरी कार्डमध्ये 5-6 दिवसांपर्यंतचा रेकॉर्ड आरामात ठेवता येतो, ते बनवण्यासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च आला आहे. डेमो पाहिल्यानंतर अधिकार्‍यांनी त्याच्याकडून आणखी काही उत्तरेही मागवली आहेत. तरुणांच्या शोधाबाबत अतिरिक्त एसपी विक्रम सिंह कुशवाह सांगतात की, तरुणांनी केलेला प्रयत्न चांगला आहे, मात्र यातील बहुतांश गोष्टी पोलिसांकडे आधीच आहेत. काही नवीन गोष्टीही सांगितल्या आहेत, ज्याबद्दलची उत्तरे प्रात्यक्षिक स्वरूपात मागवली आहेत, ती मिळाल्यानंतरच पुढे काही सांगता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news