मुलांची नावे… गुगल, कॉफी! | पुढारी

मुलांची नावे... गुगल, कॉफी!

बंगळूर : नवजात मुलाचे नाव ठरवण्यापूर्वी अनेक कुटुंबांमध्ये मोठाच काथ्याकूट होत असतो. सुंदर अर्थ असलेले गोड नाव निवडून ते मुलाला दिले जात असते. मात्र, कर्नाटकातील एका समुदायात मुलांना भलतीच नावे दिली जातात. हिक्की-पिक्की नावाच्या या आदिवासी समुदायातील मुलांना गुगल, कॉफी, म्हैसूर यापासून ते विविध नट-नट्यांचीही नावे दिली जातात!

अतिशय विचित्र नावे असली तरी या मुलांनाही त्याचे काही विशेष वाटत नाही व पालकांनाही ही नावे आवडतात! या समुदायातील लोकांचा मुख्य व्यवसाय शिकार करणे हा आहे. 1960 च्या दरम्यान या लोकांना जंगलातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी म्हैसूर व बंगळूरच्या आसपास ग्रामीण भागात आपले बस्तान बसवले. त्यांची सर्वाधिक चर्चा विचित्र नावांमुळेच होत असते. मात्र, हे लोक अनेक भाषाही बोलू शकतात हे विशेष! ते कन्नड, मल्याळम, तामिळ व तेलगू बोलू शकतात. याशिवायही अन्य काही भाषांचे ज्ञान त्यांना आहे. त्यांच्या मुला-मुलींना एलिझाबेथपासून अमिताभ, शाहरूखपर्यंत कोणतीही नावे दिली जातात.

Back to top button