सर्वात मोठ्या पावलांची महिला! | पुढारी

सर्वात मोठ्या पावलांची महिला!

वॉशिंग्टन : अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणार्‍या तान्या हर्बर्टच्या पावलांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. तिच्या पावलांचा आकार थक्क होण्याएवढा मोठा आहे. जगातल्या कोणत्याही महिलेच्या (woman) पावलांचा आकार एवढा मोठा नाही. हर्बर्टच्या उजव्या पावलाची लांबी हा 33.1 सेंटिमीटर आहे. तसेच तिच्या डाव्या पावलाची लांबी 32.5 सेंटिमीटर आहे. म्हणजेच तिचे उजवे पाऊल 13.03 इंचांचे, तर डावे पाऊल 12.79 इंच लांब आहे. हे नक्कीच अद्भुत आहे. तान्या हर्बर्ट 18 नंबरचे शूज किंवा चप्पल वापरते.

तसेच तिची उंची 6 फूट 9 इंच इतकी आहे. साधारणपणे, पाश्चात्त्य देशात इतकी उंची पुरुषांची असते. तुर्कीये रुमेयसा गेल्गी ही सध्या हयात असलेली जगातली सर्वात उंच महिला (woman) आहे. तिची उंची 7 फूट 0.7 इंच इतकी आहे. तान्याची उंची तुर्कीये गेल्गीपेक्षा केवळ तीन इंचांनी कमी आहे. तान्या हर्बर्टसाठी शूज किंवा चप्पल विकत घेणे हे जिकिरीचे काम आहे. कारण, 18 नंबरचे शूज मिळवण्यासाठी तिला अनेक दुकानांचे उंबरे झिजवावे लागतात. तिला दुकानात जायला आवडत नाही.

टेक्सासमध्ये राहणार्‍या तान्याने पुढे खुलासा केलाय, की हायस्कूलमध्ये असतानाच तिच्या पावलांचा आकार खूप मोठा होता. परंतु, तान्या अतिशय सकारात्मक आणि पुढारलेल्या कुटुंबात वाढल्याने तिला यामुळे कधीच असुरक्षित वाटलं नाही. ती कधीच त्यामुळे काळजीत पडली नाही. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्शी बोलताना तान्या म्हणाली, ‘माझ्या आई-वडिलांनी मी मोठी झाल्यावर मला खूप प्रोत्साहन दिले. आधार दिला. यामुळेच मी माझ्या या व्यंगाकडे कधीच नकारात्मकद़ृष्ट्या पाहिले नाही. मी इतकी उंच असण्याबद्दल कुणी टीकाटिप्पणी केल्याचे मला तर आठवतही नाही.

खरं तर, माझ्या मित्रमंडळींनीही नेहमीच माझी काळजी घेतली आणि मला मी जशी आहे तसं स्वीकारलं जावं यासाठी मदत केली.’ तान्या नेहमीच उंच पुरुषांसाठीचे लोफर्स किंवा टेनिस शूज विकत घ्यायची. परंतु, ते आपल्या पावलात फिट बसवण्यासाठी त्यात काही बदल तिला करावे लागत. ती म्हणाली, ‘साधारणपणे स्त्रियांना 12 किंवा 13 नंबरचा शूज घालणे अवघड जाते; पण मी मात्र 18 नंबरचे शूज घालते.’

.हेही वाचा

https://pudhari.news/vishwasanchar/489914/does-your-child-fall-asleep-while-studying-find-out-what-exactly-is-the-reason/ar

https://pudhari.news/vishwasanchar/489914/does-your-child-fall-asleep-while-studying-find-out-what-exactly-is-the-reason/ar

 

Back to top button