एक्स्प्रेस रेल्वेच्या वेगाने मासेही उडू शकतात हवेत | पुढारी

एक्स्प्रेस रेल्वेच्या वेगाने मासेही उडू शकतात हवेत

नवी दिल्ली : ‘मछली जल की रानी है…’ ही कविता आपण लहानपणी ऐकली असेलच. पाण्याशिवाय मासे आपले जीवन जगूच शकत नाहीत, पण पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकणार्‍या माशाबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? मासे कसे काय उडू शकतात, असा प्रश्न पडला असला तरी हे सत्य आहे. पाण्यात राहणारे हे मासे ताशी तब्बल 70 किमी वेगाने उडू शकतात, एकदा उड्डाण केल्यानंतर, हे मासे 200 मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात. पंखांच्या अनोख्या रचनेमुळे हे मासे पक्ष्याप्रमाणे उडू शकतात.

जगभरात सध्या माशांच्या 40 पेक्षा जास्त अशा प्रजाती आहेत की त्या हवेत उडू शकतात. त्यांना दोन्ही बाजूला पंख असून ते त्यांना उडण्यास मदत करतात. तसेच हे मासे शेपटीच्या पंखाने स्वतःला संतुलित ठेवतात. त्यांचे पंख बोटीच्या रडारसारखे असतात, जे या माशांना उडण्यास तसेच पाण्यात पोहण्यास मदत करतात.

या माशांची लांबी साधारणपणे 17 ते 30 सेंमी पर्यंत असते. त्यांची लांबी जसजशी वाढते तसतसे ते पातळ होत जातात. या माशांना पाण्याच्या वर उडणार्‍या भक्षकांपासून व पाण्याच्या आत राहणार्‍या भक्षक माशांपासूनही दूर राहावे लागते. जेव्हा हे मासे

संबंधित बातम्या

पाण्यात धोक्यात येतात तेव्हा ते उड्डाण करतात व नंतर पाण्यात परत येतात. हे मासे ग्लायडरसारखे असतात. ते हवेत उडण्यासाठी आणि पाण्यातून बाहेर येण्यासाठी शेपटीच्या साहाय्याने पाणी पंप करतात. हे मासे पाण्यापासून सहा मीटरपर्यंत उंच जाऊ शकतात. 200 मीटरपर्यंत उड्डाण केल्यानंतर त्यांना पाण्यात परत यावे लागते. तथापि, डुबकी मारल्यानंतर ते पुन्हा उड्डाण करू शकतात. पाण्यातून किकस्टार्ट घेतल्यानंतर हे मासे ताशी 70 किमी इतका वेग गाठतात. हवेत पोहोचल्यानंतर ते पंख पसरून पुढे जाऊ लागतात. पाण्यात परतण्यासाठी त्यांना पंख मागे घ्यावे लागतात.

Back to top button