'या' देशात विवाहाविना मुले जन्मास घालण्यास आता परवानगी

बीजिंग : चीनने वन चाईल्ड पॉलिसी अंमलात आणून सुमारे 40 कोटी मुलांना जन्म घेण्यापासून थांबवले, पण यामुळे या देशाची लोकसंख्या कमालीची घटू लागली आहे. घटत्या लोकसंख्येमुळे सध्या हा देश चिंतेत आहे. यामुळे लोकसंख्या वाढवण्यासाठी चीनच्या प्रांतीय सरकारने लग्न न करताही मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे.
एकेकाळी 40 कोटी बाळांना गर्भातच मारले आणि आता लग्न न करताही मुले जन्माला घालण्यास चीन सांगत आहे. या देशामध्ये वृद्धांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. चीनमध्ये ‘वन चाइल्ड पॉलिसी’मुळे गेल्या काही दशकांत जन्मदर घटला आहे. याच धोरणाचेे परीणाम चीनला सध्या परिणाम भोगावे लागत आहेत. या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी 1980 पासून लागू करण्यात आलेले वन चाईल्ड पॉलिसी चीनसाठी आता संकट ठरले.
यामुळे तरुण आणि काम करणारे लोक कमी झाले आहेत. यासाठीच लोकसंख्या वाढवण्यासाठी हा देश नवनवीन योजना आणत आहे. याचाच एक भाग म्हणूनचीन सरकारने लग्न न करताही मुले जन्माला घालण्यास परवानगी दिली आहे. चीनमध्ये महिलांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सिचुआन प्रांतातील सरकारने नियमात मोठा बदल केला आहे. येथे ज्या पालकांचे लग्न झालेले नाही, अशा पालकांसाठी प्रसूती रजा आणि वैद्यकीय खर्चाची सुविधाही सुरू करण्यात आली आहे, म्हणजेच लोक लग्न न करताही मुलांना जन्म देऊ शकतील. यापूर्वी सिचुआनमध्ये आतापर्यंत केवळ विवाहित जोडप्यांनाच या सरकारी सुविधांचा लाभ मिळत होता.