जुळ्यांना ओळखता न आल्याने आई गेली पोलिसात | पुढारी

जुळ्यांना ओळखता न आल्याने आई गेली पोलिसात

माद्रिद : असे म्हटले जाते की, आई आणि तिचे मूल जेव्हा गर्भात असतात तेव्हाच त्यांचे नाते एकमेकांशी जोडले जाते. आईला काहीही न बोलता बाळाशी संबंधित सर्व काही समजते. मात्र, अर्जेंटिनामध्ये राहणार्‍या एका आईसोबत एक वेगळीच घटना घडली, जेव्हा ती स्वतःच्या जुळ्या मुलांबाबत इतकी गोंधळून गेली की ती त्यांना वेगळे वेगळे ओळखूच शकली नाही. सोफिया रॉड्रिग्ज असे तिचे नाव आहे. तिने स्वतः ट्विटरवर आपल्याबाबत घडलेल्या या घटनेबद्दल सांगितले.

आई सोफियाने सांगितले की, प्रचंड साम्य असल्याने तिला तिच्या जुळ्या मुलांना वेगळे वेगळे ओळखता येत नाही. दोन्ही एकसारखे दिसतात आणि त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी कोणतेही विशेष चिन्ह नाही. यामुळे त्यांना ओळखणे अवघड बनले आहे.

अशा विचित्र परिस्थितीत आपल्याच मुलांना ओळखण्यासाठी सोफियाने एक मार्ग शोधून काढला. तिने मुलांना ओळखण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. याठिकाणी दोन्ही मुलांचे फिंगरप्रिंट्स घेण्यात आले, जेणेकरून त्यांची ओळख पटू शकेल. मात्र, या मुलांचे बोटांचे ठसे पोलिसांच्या डेटाबेसमध्ये नसल्याने ही युक्तीही उपयोगी पडली नाही. आईचे म्हणणे आहे की तिने मुलांचे बोटांचे ठसे घेतले होते, पण ते सिस्टीममध्ये दिसत नव्हते. मुलंही खूपच लहान आहेत, अशा प्रकारे छायाचित्रांतूनही त्यांची ओळख होत नाही.

एकाच मुलाला दोनदा लसीकरण केल्याचे लक्षात आल्यावर तिचा हा संभ्रम चव्हाट्यावर आला, असे सोफियाये सांगितले. त्याच वेळी, मुलांत असलेल्या कमालीच्या साम्यपणामुळे त्यांचे मेडिकल रेकॉर्ड ठेवणे देखील कठीण बनले आहे. आता कोणते मूल कोण आहे हे त्यांना ओळखता येत नसल्याने ते त्यांचे नावही घेत नाहीत. यासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर अनेकांनी आपली कहाणी सांगितली. आपण आपली जुळी मुले ओळखण्यासाठी कोणती पद्धत अवलंबिली होती, हे सुद्धा ते सांगत आहेत.

Back to top button