तीन मुलांचा बाप घालतो स्कर्ट आणि हाय हिल्स | पुढारी

तीन मुलांचा बाप घालतो स्कर्ट आणि हाय हिल्स

टेक्सास : एखाद्या व्यक्तीने कोणते कपडे परिधान करावे, ही ज्याची त्याची स्वतःची निवड असते. कपड्यांबाबत प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या आवडी-निवडी असतात. आता एका अमेरिकन माणसाचेच घ्या, त्याला पुरुषांपेक्षा चक्क स्त्रियांचे कपडे जास्त आवडतात.

अमेरिकेतील टेक्सास येथील रहिवासी असलेला मार्क हा सध्या जर्मनीत राहतो आणि उल्लेखनीय म्हणजे तो रोबोटिक्स अभियंता आहे. तोही विचित्र अशा कपड्यांमध्ये त्याच्या ऑफिसला जातो. कपड्यांमध्ये लिंगभेद नसल्याचे तो सांगतो. तेच तेच कपडे वापल्याने त्याचा कंटाळा आल्यावर त्याने एक नवा आणि अनोखा प्रयोग सुरू केला.

मार्क ब्रायन असे या 63 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. तो त्याच्या स्टाईल व स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत राहतो. जर स्त्रिया पँट सूट घालू शकत असतील, आपण स्कर्ट आणि उंच टाचांच्या पादत्राणे का घालू शकत नाही, असे त्याचे मत आहे.

पत्नीसोबत खरेदी करताना मार्कला महिलांच्या कपड्याबाबत आवड निर्माण झाली. तेच तेच कपडे घालून कंटाळलेल्या मार्कने आपली स्टाईल बदलली आणि 2015 पासून त्याने स्कर्ट आणि हाय हिल्स वापरण्यास सुरुवात केली. लोकांनी ऑफिसमध्ये खिल्ली उडवली आणि लोक त्याला समलिंगी देखील म्हणत होते. मात्र, त्याने याकडे दुर्लक्ष केले.

तीन मुलांचा बाप असलेला मार्क स्पष्टपणे सांगतो, की कपड्यांत कोणतेही वेगळेपण नसते. ज्यांना जे घालायला आवडते ते ते घालू शकतात. पतीच्या या असामान्य सवयीबद्दल मार्कच्या पत्नीला कोणताही आक्षेप नाही. यामुळे गेली 5 वर्षे तो ऑफिसला जातानाही स्कर्ट आणि हील्स घालतो. मार्क सांगतो की, कॉलेजच्या काळापासून त्याला स्टाइलमधील बदल आवडला. याआधी तो सार्वजनिक ठिकाणी हाय हिल्स घालत नसे, तर आपल्या खोलीत घालत असे. टाचांपासून आत्मविश्वास मिळतो, असे तो सांगतो.

Back to top button