हनुमान फळात अनेक आरोग्यदायी गुण | पुढारी

हनुमान फळात अनेक आरोग्यदायी गुण

नवी दिल्ली : रामफळ, सीताफळ जसे असते तसेच हनुमान फळही असते. या हनुमान फळाचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक प्रकारचे लाभ मिळतात असे तज्ज्ञ सांगतात.

या फळाच्या सेवनाने पोटातील अल्सर किंवा गॅस्ट्रिक अल्सर कमी होण्यास मदत होते, त्याशिवाय यकृताला अल्सरमुळे होणार्‍या हानीपासून वाचवण्यासही मदत होते. हनुमान फळ कर्करोगाच्या पेशींना दूर करण्यास मदत करू शकते, या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी असते, जे कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंधित करते. या फळामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे बॅक्टेरियाशी लढून आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून अनेक रोगांपासून शरीराचे संरक्षण करतात.

हनुमान फळामध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म वेदना शांत करतात आणि सांध्याची लवचिकता सुधारतात तसेच सूज देखील कमी करतात. हनुमान फळाचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मूत्रमार्गाचा संसर्ग या समस्येशी लढण्यासाठी हनुमान फळ खाणे लाभदायक आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे लघवीतील आम्लीय पातळी राखण्यास मदत होते. हे फळ पचनसंस्थेसाठीही चांगले मानले जाते.

Back to top button