

वॉशिंग्टन : मंगळभूमीवर वावरत असलेल्या 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरचे एक छायाचित्र अंतराळातून टिपण्यात आले आहे. हे रोव्हर मंगळाच्या जेझेरो क्रेटर या नावाने ओळखल्या जाणार्या विवरात फेब्रुवारीमध्ये उतरले होते. त्याचे छायाचित्र मार्स कनायसन्स ऑर्बिटरने टिपले आहे.
विवराच्या टेकड्यांदरम्यान या रोव्हरचा ठिपका छायाचित्रात दिसतो. जेझेरो क्रेटरमध्ये दगडांचे नमुने गोळा करून हे रोव्हर मंगळावर एके काळी जीवसृष्टी होती का याचे संशोधन करणार आहे. त्यासाठी मंगळाचा भूगर्भशास्त्रीय इतिहास या माध्यमातून तपासून पाहिला जाणार आहे. मंगळाच्या इतिहासात हा तांबडा ग्रह कधी जीवसृष्टीला पोषक होता का हे यामधून स्पष्ट होईल.
मंगळाच्या कक्षेत फिरत असलेल्या 'मार्स रिकनायसन्स ऑर्बिटर'ने त्याचे छायाचित्र टिपून घेतले. मार्च 2006 पासून हे ऑर्बिटर मंगळाभोवती फिरत आहे. याचवर्षी त्याने आपली मंगळाभोवतीची पंधरा वर्षे पूर्ण केली आहेत.
मंगळावर एके काळी वाहते पाणी होते याच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे एके काळी तिथे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असावे असे मानले जाते. आता पर्सिव्हरन्स रोव्हरच्या माध्यमातून याबाबत संशोधन होत आहे.