‘नासा’ने ‘इस्रो’ला सुपूर्द केला ‘निसार’ उपग्रह

‘नासा’ने ‘इस्रो’ला सुपूर्द केला ‘निसार’ उपग्रह

बंगळूर : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'नासा'ने 'निसार' हा सॅटेलाईट भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्त्रो'कडे सोपवला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हा निसार उपग्रह भारतात आणण्यात आला.

यूएस एअर फोर्सचे सी-17 विमान बुधवारी (8 मार्च) बंगळूरमध्ये उतरले. या विमानातून आणलेला 'नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार' (NISAR) उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच, इस्रो कडे सुपूर्द करण्यात आला. भारत-अमेरिका या दोन देशांच्या संबंधांमध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. नासा आणि इस्रो संयुक्तपणे हा उपग्रह तयार करत आहे.

'नासा'ने 'निसार उपग्रहाचे' पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले असून हा उपग्रह पुढील काम आणि लाँचिंगसाठी इस्रोकडे पाठवण्यात आला आहे. आता इस्रो यावर काम करेल, त्यानंतर 2024 मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण पार पडणार आहे. अमेरिकन वाणिज्य दुतावासाच्या अधिकार्‍यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. इस्रो आणि नासा यांच्याकडून हे संयुक्त अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत 'निसार' उपग्रह तयार करण्यात येत आहे.

2024 मध्ये हा सॅटेलाईट लाँच करण्यात येईल. या उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या उपग्रहाचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भूस्खलनप्रवण क्षेत्रे शोधणे तसेच कृषी क्षेत्रासह विविध कारणांसाठी केला जाईल. सर्वकाही सुरळीत पार पडलं तर, निसार उपग्रह 2024 मध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात येईल. निसार उपग्रह किमान तीन वर्षे काम करेल. निसार उपग्रह 12 दिवसांत संपूर्ण जगाचा नकाशा तयार करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news