जगातील सर्वात मोठा पिझ्झा! | पुढारी

जगातील सर्वात मोठा पिझ्झा!

लॉस एंजिल्स : पिझ्झा तयार करणार्‍या एका कंपनीने जगातला सर्वात मोठा असा पिझ्झा तयार केला व त्याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. तब्बल 13,990 चौरस फूट इतक्या मोठ्या आकाराचा हा पिझ्झा तयार करण्यात आला.

लॉस एंजेलिस कन्व्हेंशन सेंटर इथल्या भल्या मोठ्या सभागृहात हा भव्य पिझ्झा तयार करण्यात आला. 13990 चौरस फूट आकाराचा हा पिझ्झा तयार करण्यासाठी 13653 पाऊड पिठाचा गोळा, 8 हजार पाऊंडपेक्षा जास्त चीज, 4948 पाऊंड मरिनारा सॉस आणि पेपरोनीचे 6,30,496 तुकडे वापरण्यात आले. हा पिझ्झा तयार करण्यासाठी कंपनीतल्या कुशल कर्मचार्‍यांची एक टीम तयार केली होती.

त्यांनी फरशीवर पिझ्झाच्या पिठाचे तुकडे व्यवस्थित जोडले. त्यानंतर त्यावर मरिनारा सॉस, पेपरोनी आणि चीज पसरले. हा इतका मोठा पिझ्झा बेक करण्यासाठी त्यांनी फिरत्या बेकिंग मशिनचा वापर केला. त्याद्वारे पिझ्झाच्या प्रत्येक भागाला काळजीपूर्वक बेक करण्यात आले. तयार झालेल्या या मोठ्या पिझ्झाचे तब्बल 68 हजार तुकडे झाले.

Back to top button