Facebook Reel : ‘फेसबुक’वर आता 90 सेकंदांचे रील शक्य | पुढारी

Facebook Reel : ‘फेसबुक’वर आता 90 सेकंदांचे रील शक्य

वॉशिंग्टन : सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक टेक कंपन्याही नवनवे फिचर्स (Facebook Reel) आणून आपल्या यूजर्सना खूश करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘फेसबुक’च्या वापरकर्त्यांसाठी नवीन ‘क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन’ फिचर्स लाँच करण्यात आले आहेत. आता फेसबुक वापरकर्ते 90 सेकंदांचे रील तयार करू शकतील. पूर्वी फक्त 60 सेकंदांची मर्यादा होती. तसेच, वापरकर्ते इन्स्टाग्रामप्रमाणेच त्यांच्या ‘मेमरीज’चे ‘रेडीमेड’ रील सहज तयार करू शकतात. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने ‘मेटा फॉर क्रिएटर्स’ अकाऊंटवरून फेसबुकवर ही घोषणा केली आहे.

एजन्सीनुसार, मेटाने फेसबुकमध्ये नवीन ग्रूव्ह फिचर देखील लॉन्च केले आहे. हे फिचर यूजर्सच्या (Facebook Reel) व्हिडीओमधली गती गाण्याच्या तालावर आपोआप सिंक करते. नवीन टेम्प्लेटस् टूल वापरकर्त्यांना ट्रेंडिंग टेम्प्लेटस्सह सहजपणे रील तयार करता येईल. मेटाने गेल्या वर्षी फेसबुकसाठी रील क्रिएटर फिचर्स आणले होते. गेल्या महिन्यात मेटाने घोषणा केली की, ते वापरकर्त्यांना जाहिराती देण्यासाठी मशिन लर्निंग मॉडेल्स वापरणार आहे. हे मॉडेल कसे कार्य करते, याबद्दल अधिक पारदर्शकता प्रदान करण्यासाठी कंपनी फेसबुकची ‘मी ही जाहिरात का पाहत आहे?’ अद्ययावत करीत आहे. हे वापरकर्ते पाहत असलेल्या जाहिरातींना आकार देण्यासाठी आणि जाहिराती वितरित करण्यासाठी वापरले जाते.

Back to top button