Earphone Side Effects : इअरफोनचा वापर सुसाट, तर कान होतील भुईसपाट

Earphone Side Effects
Earphone Side Effects

मुंबई ः वर्क फ्रॉम होम, घरी बसून दीर्घकाळ वेबसीरिज पाहणे, सतत फोन सुरू असणे आणि त्याकरिता तासन् तास इअरफोन्सचा (Earphone Side Effects) वापर करण्याचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. यामुळे डोकेदुखी, कान दुखणे अशा समस्या पाहायला मिळतात. तज्ज्ञांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. कानाचा पडदा व्हायब्रेट व्हायला लागतो. दूरचा आवाज ऐकण्यात त्रास होतो.

यामुळे तुम्हाला बहिरेपणादेखील येऊ शकतो. तसेच कान दुखणे, डोकेदुखी, झोप न येणे अशा समस्या उद्भवतात. इअरफोन कानात घालून मोठ्या आवाजात गाणी एकल्याने मानसिक ताण वाढू शकतो. इअरफोनच्या (Earphone Side Effects) अतिवापरामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचते. अधिक वेळ इअरफोनच्या वापराने कानातील पेशी मृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना इअरफोन वापरापासून परावृत्त करणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

जास्त वेळ इअरफोनचा वापर केल्यास कानात हवा जाण्याच मार्ग राहत नाही आणि त्यामुळे कानात संसर्ग होऊन त्याचा परिणाम श्रवणशक्तीवर होऊ शकतो.

सतत इअरफोनच्या वापराने जीवाणूंची वाढ होऊन कानात मळ साठू शकतो. इअरफोनमधून (Earphone Side Effects) निघणारे चुंबकीय तरंग मेंदूला नुकसान पोहोचवून त्यावर वाईट परिणाम करू शकतात. हेडफोन वापरण्याने कानाच्या बाहेरील भागात त्वचेचा संसर्ग होतो. कानाच्या त्वचेला फोड येणे, कानात बुरशी होणे, तयार झालेला मळ बाहेर न पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. कानाच्या आतील भागात आवाज प्रदूषणामुळे बहिरेपणा वाढण्याचा धोका वाढतो.

दुसर्‍या व्यक्तीने वापरलेले हेडफोन्स (Earphone Side Effects) स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा. तसे केल्याने जेणेकरून कानाचा संसर्ग पसरणार नाही. इअरफोन्सचा वापर कानांसोबत हृदयालाही नुकसानदायी होऊ शकतो. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढू शकते. यावर एकमेव उपाय म्हणजे इअरफोनचा वापर कामाशिवाय करणे टाळणे किंवा कमी करणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news