पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडल्या 1500 वर्षांपूर्वीच्या कबरी | पुढारी

पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडल्या 1500 वर्षांपूर्वीच्या कबरी

लिमा : पेरूच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी 1000 ते 1500 इसवी सनापर्यंत पेरूच्या मध्य किनार्‍यावरील खोर्‍यात वस्ती करणार्‍या चाँके लोकांच्या स्मशानभूमीत सुमारे 30 कबरी शोधल्या आहेत. सॅन मार्कोस युनिव्हर्सिटीचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ पीटर व्हॅन डॅलेन यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, नव्याने सापडलेल्या जुन्या कबरींच्या तज्ज्ञांना चाँके संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्याची परवानगी दिली आहे.

व्हॅन डॅलेन यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षात आम्हाला चाँके संस्कृतीच्या वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये 2000 हून अधिक दफन केलेल्या वस्तू सापडल्या आहेत. या कबरी वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील लोकांच्या असाव्यात, असा पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यातील काही कबरी जमिनीपासून सुमारे साडेसोळा फूट खाली सापडल्या आहेत. सध्या त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून प्राचीन मानवी संस्कृतीवर यानिमित्ताने प्रकाश पडेल, असे तज्ज्ञांना वाटते.

Back to top button