Brain surgery : 3400 वर्षांपूर्वीची ‘मेंदूवरील शस्त्रक्रिया’! | पुढारी

Brain surgery : 3400 वर्षांपूर्वीची ‘मेंदूवरील शस्त्रक्रिया’!

तेल अवीव : उत्तर इस्रायलमध्ये कांस्य युगाच्या अखेरच्या काळातील दोन भावांचे सांगाडे सापडले आहेत. (Brain surgery) या दोघांनाही 3400 वर्षांपूर्वी दफन करण्यात आले होते. दोघांनाही गंभीर आजार होता व त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही करण्यात आले होते. या दोघांपैकी थोरल्या भावाच्या कवटीमध्ये चौकोनी छेद दिसून आला आहे. ही त्या काळातील शस्त्रक्रिया असू शकते असे संशोधकांना वाटते.

प्राचीन काळी वेगवेगळ्या आजारांवर उपचार म्हणून कवटीला छेद देण्याचाही उपचार केला जात असे. मेंदूला धक्का न लावता असे छिद्र पाडले जात असे. (Brain surgery) ‘प्लस वन’ नावाच्या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हा वैद्यकीय उपचाराचाच भाग होता याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काही संशोधकांना वाटते की या माणसावर उपचार करण्यासाठी म्हणून कवटीला हे छिद्र पाडलेले नसावे. त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या विधीचा एक भाग म्हणून असा प्रकार केलेला असू शकतो.

तेल मेगिद्दो येथील एका थडग्यात 2016 मध्ये या दोन सांगाड्यांचा शोध (Brain surgery) लावण्यात आला होता. या सांगाड्यांच्या डीएनए टेस्टवरून हे समजले की दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ होते. अधिक संशोधनानंतर दिसून आले की या दोघांनाही विशिष्ट जनुकीय आजार होता व त्यामुळे त्यांच्या हाडांची हानी झाली होती.

ब्राऊन युनिव्हर्सिटीतील रेचेल कॅलिशर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मृत्यूवेळी धाकटा भाऊ 19-20 वर्षांचा होता तर थोरला भाऊ 21 ते 46 वर्षांदरम्यानचा होता. यापैकी धाकट्या भावाचा आधी मृत्यू झाला व त्यानंतर काही वर्षांनी थोरल्या भावाचा मृत्यू झाला. थोरल्या भावाच्या कवटीत 1.2 इंचाचे चौकोनी छिद्र आहे. त्याची कवटी बरी झाल्याचे चिन्ह दिसत नसल्याने संशोधकांना वाटते की हा माणूस मृत्युमुखी पडण्याच्या आठवडाभर आधी हे छिद्र बनवण्यात आले असावे. त्याचा जीव वाचावा (Brain surgery) यासाठी करण्यात आलेला हा अखेरचा उपाय असू शकतो.

हेही वाचा : 

Back to top button