सी ड्रॅगनचे बिर्‍हाड शेपटीवर!

सी ड्रॅगनचे बिर्‍हाड शेपटीवर!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : 'विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर' असे आपल्याकडे म्हटले जाते. विंचवांच्या काही प्रजातींमध्ये त्यांची पिल्ली आपल्या आईच्या पाठीवर बसून सर्वत्र जात असतात. सी हॉर्स, सी ड्रॅगन्स किंवा समुद्री घोड्यांबाबत पिल्लांचा जन्म व त्यांचे पालनपोषण ही जबाबदारी आईकडे नव्हे तर बापाकडे असते. आता शेपटीवर मोत्यांची लगड लावल्यासारखे अंडी चिकटवून त्यांना घेऊन जात असलेल्या एका नर सी ड्रॅगनचे सुंदर छायाचित्र टिपण्यात यश आले आहे.

सी ड्रॅगन हे घोड्यापेक्षा 'ड्रॅगन' या काल्पनिक प्राण्यासारखेच अधिक दिसतात. ते सामान्य 'सी हॉर्स' किंवा समुद्री घोड्याच्या तुलनेत अधिक रंगीबेरंगीही असतात. आता अशाच एका सी ड्रॅगनचे हे छायाचित्र समोर आले आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या गवतावरून पोहत जात असलेल्या या सी ड्रॅगनच्या शेपटीवर मोती लटकवले असावेत अशी अंडी लटकलेली आहेत. 'अंडरवॉटर फोटोग्राफी गाईड'च्या '2022 ओशन आर्ट' स्पर्धेतील 'कॉम्पॅक्ट बिहेवियर' श्रेणीत हे छायाचित्र समाविष्ट झाले होते. ते आता संशोधनाच्या द़ृष्टीनेही महत्त्वाचे ठरले आहे. असे सी ड्रॅगन्स हे समुद्रात 13 ते 20 फूट खोलीवर आढळतात. अर्थात ते 160 फूट खोलीपर्यंतही जाऊ शकतात. जुलै किंवा ऑगस्टच्या सुरुवातीस त्यांचा प्रजननाचा हंगाम असतो. सुरुवातीला त्यांची अंडी लालसर, नारंगी रंगाची असतात व त्यामध्ये भ—ूणाची वाढ होऊ लागल्यावर ती तपकिरी बनू लागतात. अशी अंडी सांभाळण्याचे काम नराकडेच असते. समुद्री घोडे व पाईपफिशमध्येही नरच हे काम करतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news