12 Hour Clock System : दिवस 24 तासांचा, घड्याळात बाराच तास का?

12 Hour Clock System : दिवस 24 तासांचा, घड्याळात बाराच तास का?

नवी दिल्ली : आपण दैनंदिन जीवनात नेहमी वापरत असलेल्या अनेक गोष्टींचे कुतुहलही असते. त्यामध्येच घड्याळाचाही समावेश आहे. दिवस 24 तासांचा (12 Hour Clock System) असूनही घड्याळात मात्र बाराच तास असतात आणि तरीही आपण दिवस व रात्रीच्या वेळेची गल्लत करीत नाही. मात्र, 'एएम' आणि 'पीएम'बाबत अनेक लोक गफलत करतात आणि रात्रीच्या नऊची गाडी असेल तर सकाळी नऊ वाजता स्टेशनवर जाऊ शकतात! त्यामुळेच अनेकजण रेल्वे, विमान किंवा इतर कार्यक्रमांचे तिकीट अथवा पास हातात पडल्यानंतर वेळ 'एएम' आहे की 'पीएम' हे फार काळजीपूर्वक पाहतात.

भारताबरोबरच जगातील बहुतांश देशांमध्ये 12 तासांची क्लॉक सिस्टीम (12 Hour Clock System) वापरली जाते. मात्र, दिवसात 24 तास असतानाच अनेक देश 12 तासांचे घड्याळ का वापरतात किंवा घड्याळ म्हटल्यावर ते 12 तासांचे का असते? असा कधी विचार केला आहे का? म्हणजेच थेट 24 तासांचे घड्याळ असते तर ते अधिक सोयीस्कर झाले असते आणि अनेकांचा गोंधळ टळला असता असा विचार अनेकांच्या मनात येत असेल. एका रिपोर्टनुसार प्राचीन मेसोपोटामिया आणि इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीमध्ये या 12 तासांच्या घडाळ्याचे मूळ लपलेले आहे.

या संस्कृतीमधील मानवाने दिवसाला 2 टप्प्यांमध्ये विभाजित केले होते. दिवसाचा कालावधी आणि रात्रीचा कालावधी. दिवस हा सूर्याच्या परिक्रमेवर मोजला जायचा. तर रात्री ही चंद्राच्या परिक्रमेच्या आधारे मोजली जायची. याच कारणामुळे घड्याळ (12 Hour Clock System) बनवताना 'एम' आणि 'पीएम' ची संकल्पना अंमलात आली. इजिप्तमधील लोकांची सूर्याच्या मदतीने दिवस मोजण्याची आणि वॉटर डायलच्या मदतीने दिवस मोजण्याची सिस्टीम 12 तासांची होती.

वॉटर डायल हे एक खास प्रकारचे घड्याळ होते. या घड्याळ्याच्या मदतीने रात्रीच्यावेळीचा म्हणजेच सूर्यास्त ते सूर्योदयासंदयामधील कालावधी मोजण्याचे काम केले जायचे. 24 तास मोजण्याची सिस्टीम (12 Hour Clock System) सध्या चांगली वाटत असली तर मागील अनेक शतकांपासून 12 ची सिस्टीम वापरली जात आहे. तसेच वर्तुळामध्ये 12 आकडे दाखवणे हे 24 आकडे दाखवण्यापेक्षा अधिक सुटसुटीत आहे. त्यामुळे आता 12 ची सिस्टीम अचानक बदलणे शक्य होणार नाही. तरीही इंटरनेटवरील व्यवहारांमध्ये हळूहळू 24 तासांची सिस्टीम लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news