केनियात सापडली सर्वात प्राचीन दगडी अवजारे | पुढारी

केनियात सापडली सर्वात प्राचीन दगडी अवजारे

नैरोबी : केनियातील पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात 2.9 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मानवांनी वापरलेली दगडी अवजारे सापडली आहेत. ही अवजारे आतापर्यंतच्या सर्वात जुन्या दगडी अवजारांपैकी एक ठरली आहेत. विशेष म्हणजे या अवजारांचा वापर केवळ आधुनिक मानवाचे पूर्वज असलेल्या होमो सेपियन्सनी केलेला नसून मानवाच्या अन्य शाखांमधील लोकांनीही केला आहे.

या दगडी अवजारांचा वापर पाणघोड्याचे मांस काढण्यासाठी तसेच फळांचा गर काढण्यासाठीही केला जात असे. याच ठिकाणी मानवाचा एक नातेवाईक असलेल्या ‘पॅरँथ्रोपस’ या प्रजातीमधील माणसाचे जीवाश्मभूत दातही सापडले आहेत. हे दोन मोठे दात संशोधकांच्या कुतुहलाचा विषय बनले आहेत.

संशोधकांना यापूर्वी वाटत होते की ‘ओल्डोवन’ अवजारांचाच होमो सेपियन्सच्या पूर्वजांनी किंवा अन्य जवळच्या नातेवाईकांनी वापर केलेला असावा. ही साधी दगडी साधने होती. मात्र, आता तशा अनेक अवजारांचा याठिकाणी शोध लागला आहे. मात्र, पश्चिम केनियाच्या होमा पेनिन्सुलामधील न्यायांगा येथील या उत्खननात होमो सेपियन्स मानवाचे कोणतेही जीवाश्म सापडलेले नाही. मात्र, एप व मानवाचे मिश्रण असलेल्या पॅरँथ्रोपस कुळातील प्राण्याचे दोन दात याठिकाणी सापडले तसेच 330 दगडी अवजारे सापडली.

Back to top button