Indian Railway toilet : त्‍यांचे ‘एक पत्र’ अन् तेंव्हापासून रेल्‍वेत टॉयलेटची व्यवस्‍था सुरू

Indian Railway toilet
Indian Railway toilet
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतात 1853 साली पहिल्यांदा रेल्वे धावली. त्यावेळी त्या रेल्वेत टॉयलेट (Indian Railway toilet) नव्हते. त्यानंतरही तब्बल 56 वर्षे रेल्वे विनाटॉयलेटच धावत होती. 1909 मध्ये रेल्वेमध्ये पहिल्यांदा टॉयलेटची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली, पण ही व्यवस्था केवळ एका पत्रामुळे सुरू झाली.

पोट विकाराने त्रस्त असलेल्या एका प्रवाशाने साहिबगंज मंडल कार्यालयाला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने लिहिले होते की, मी टॉयलेटसाठी ट्रेनमधून (Indian Railway toilet) खाली उतरलो होतो, पण माझ्यासाठी रेल्वे दोन मिनिटेही थांबली नाही. गार्डच्या या हरकतीमुळे घाईघाईत रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात मी ट्रॅकवर पडलो. अशा स्थितीतही मी धावत होतो, पण रेल्वेमध्ये चढण्याच्या प्रयत्नात मी जखमी झालो.

प्रवाशाच्या या पत्राची रेल्वेने त्यावेळी गंभीर दखल घेतली आणि मोठा बदल करत 50 मैलापेक्षा जास्त अंतर धावणार्‍या रेल्वेंमध्ये टॉयलेंटची (Indian Railway toilet) सोय उपलब्ध करून देण्यात आली. खरे तर हे पत्र अखिल चंद्र सेन यांनी लिहिले होते. या पत्रात त्यांनी लिहिले होते की, मी पोटविकाराने त्रस्त होतो. यामुळे मला टॉयलेटसाठी खाली उतरावे लागले, पण याचवेळी गार्डने सिटी वाजविली आणि रेल्वे धावू लागली. धोतर आणि लोटा सांभाळत मी रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत होतो. ही घटना अनेक लोक पाहात होते. यावेळी मी पडून जखमी झालो. रेल्वे न थांबवणार्‍या गार्डला जबर दंड ठोठावण्यात यावा. जर असे झाले नाही तर मी हे पत्र प्रसिद्धी माध्यमांना देणार आहे, असा त्यांनी इशाराच दिला.

1909 मध्ये अखिल चंद्र सेन यांच्या बाबतीत ही घटना घडली नसती आणि त्यांनी रेल्वे (Indian Railway toilet) अधिकार्‍यांना खरमरीत पत्र लिहिले नसते तर पुढील आणखी काही वर्षे टॉयलेटविनाच रेल्वे धावली असती.

सध्या रेल्वे गाड्या (Indian Railway toilet) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहेत. मात्र, त्यावेळी टॉयलेटची सुविधा पुरवणे ही बाब रेल्वेमधील व्यवस्था सुधारण्यासाठीचे पहिले पाऊल ठरले. दरम्यान, अखिल चंद्र सेन यांचे पत्र आजही दिल्लीतील रेल्वे म्युझियममध्ये सुरक्षित ठेवले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news