अवघ्या 53 सेकंदांचा हवाई प्रवास

अवघ्या 53 सेकंदांचा हवाई प्रवास
Published on
Updated on

लंडन : अनेकांना फिरण्याची आवड असते. काहींना रस्ते मार्गाने, काहींना ट्रेनने तर काहींना हवाई मार्गाने प्रवास करायला आवडते. जगभरात अनेक सुंदर ठिकाणे असून ती एकमेकांपासून फार दूर आहेत. विमान प्रवासानेही असा लांबचा प्रवास करताना खूप वेळ जातो. मात्र, असाही एक विमान प्रवास आहे, ज्यात विमानाने टेक ऑफ आणि लँड केल्यानंतर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी अवघे 53 सेकंद लागतात. विशेष म्हणजे हे कोणतेही खासगी जेट नसून एक व्यावसायिक विमान आहे. दररोज अनेक प्रवासी या विमानाने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातात.

हवामान उत्तम असेल तर नियोजित वेळेत हा प्रवास पार पडतो. अन्यथा दीड मिनिटे लागू शकतात. हा प्रवास आहे स्कॉटलंडमधील. या दोन बेटांना जोडणार पूल नसल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे. तिथला समुद्र अत्यंत खडकाळ असल्याने बोट चालवणे जोखमीचे आहे. यामुळे प्रवासी एका बेटावरून दुसर्‍या बेटावर जाण्यासाठी या विमानाची मदत घेतात. हे उड्डाण लोगान एअरलाईनद्वारे चालवले जाते. ही एअरलाईन गेल्या 50 वर्षांपासून येथे सेवा देत आहे. या बेटांची नावे आहेत वेस्ट्रो आणि पापा वेस्ट्रे. दोन्ही बेटांमध्ये 2.7 किलोमीटरचे अंतर आहे. वेस्ट्रेमध्ये 600 लोक राहतात आणि सुमारे 90 लोक पापा वेस्ट्रेमध्ये राहतात. आपल्या देशात ज्याप्रमाणे बसस्थानकावर बसेस चालवल्या जातात त्याच पद्धतीने येथे विमानसेवा चालवली जाते. ही विमाने 8 आसनी आहेत.

पर्यटक आणि स्थानिक लोक या सेवेचा लाभ घेतात. या सर्वात लहान उड्डाणासाठी दररोज प्रवाशांना सुमारे 14 पौंड खर्च करावे लागतात. 14 पौंड म्हणजे सुमारे 1815 रुपये. तथापि, स्कॉटलंडमधील चलनाच्या तुलनेत हे भाडे अल्पच आहे. शिवाय तेथील सरकार या दोन बेटांवर राहणार्‍या लोकांना या विमान भाड्यात सबसिडी देत असल्यामुळे प्रवाशांना कमी भाडे मोजावे लागते. दोन्ही बेटांवर राहणारे स्थानिक लोक पर्यटनातून आपला उदरनिर्वाह करतात. या छोट्या फ्लाइटमधून प्रवास करण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक या बेटांना आवर्जून भेट देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news