

लंडन : फार पूर्वी जेव्हा प्रभावी औषधांचा शोध लागला नव्हता तेव्हा इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सर्वेसर्वा असलेला चंगेज खान (Genghis Khan) युद्धात जखमी झालेल्या आपल्या सैनिकांना मदत करण्यासाठी अळ्यांची गाडी घेऊनच जगभर प्रवास करायचा. त्याचे कारण म्हणजे या अळ्या सैनिकांच्या जखमेवर सोडल्या जायच्या आणि जखमेच्या आजूबाजूचे मांस त्या खायच्या. अर्थात, हे मांस खराब झालेले असायचे. तज्ज्ञांच्या मते चंगेज खान आणि त्याच्या सैन्याला माहीत होते की, या अळ्या फक्त खराब कोशिकाच खात नाहीत, तर संसर्ग झालेल्या कोशिका खाऊन जखमाही साफ करतात. ही गोष्ट केवळ मंगोल लोकांनाच माहीत होती, असेही नाही.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये राहणारी नगियमपास ही प्राचीन आदिवासी जमात, उत्तर म्यानमारच्या जमाती आणि मध्य अमेरिकेतील माया संस्कृतीतील लोकांनादेखील या अळ्यांच्या वापराबाबत माहिती असल्याचे पुरावे आहेत. तथापि, मुख्य प्रवाहातील वैद्यकीय शास्त्राने (Genghis Khan) याकडे कायम दुर्लक्ष केले. अखेर अमेरिकेतील गृहयुद्धाच्या काळात डॅनव्हिल रुग्णालयात काम करणारे शल्यचिकित्सक जॉन फोर्नी झकारियास यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. ते पहिले असे शल्यचिकित्सक होते ज्यांनी माणसांच्या जखमांमधील कुजलेले मांस काढून टाकण्यासाठी अळ्यांचा वापर केला होता. विशेष म्हणजे त्याचे चांगले परिणाम दिसून आले. शिवाय या अळ्यांनी जखमांवरील जंतू सुद्धा स्वच्छ केल्याचे जॉन यांना आढळून आले.
पुढे रॉबर्ट कोच आणि लुई पाश्चर यांसारख्या शास्त्रज्ञांमुळे (Genghis Khan) फोर्नी यांचे प्रयत्न थांबले. याचदरम्यान अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलीनचा शोध लावला. एक लहानशी गोळी तुमची जखम बरी करू शकत असेल तर त्या जखमेवर अळ्या सोडणे कोणाला आवडले असते? 1980 च्या दशकात ही लहानशी गोळीसुद्धा मागे पडायला लागली. मेथिसिलिन-रेजिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरियस या जीवाणूवर या गोळीचा परिणाम होत नव्हता. त्यामुळे या सुपर बॅक्टेरियाशी लढण्यासाठी नव्या हत्याराची गरज होती. त्यावेळी पुन्हा एकदा मदतीसाठी अळ्या पुढे आल्या. या अळ्या केवळ जखमेवरील कुजलेलं मांसच खायच्या नाहीत, तर जखमेत असलेल्या मेथिसिलिन-रेजिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरियस जीवाणूंचा नायनाट करायच्या.
वैज्ञानिक भाषेतील नाव 'मॅगॉट्स'
या अळ्यांना वैज्ञानिक भाषेत 'मॅगॉट्स' असे संबोधले जाते. त्यांना कोणतेही अवयव नसतात. त्यांचे मुख्य काम म्हणजे, जितके शक्य असेल तितके खाऊन आहे त्यापेक्षा 100 पटींनी मोठे होत जाणे. (Genghis Khan) इथे ज्या 'मॅगॉट्स' किंवा अळ्यांबद्दल बोलतोय त्या ब्लो फ्लाय, फ्लेश ब्लो फ्लाय, ब्लू फ्लाय, ग्रीन फ्लाय या प्रजातींशी संबंधित आहेत. यातील बहुतेक प्रजातींचा औषधोपचारात खूप उपयोग होतो.