नखांच्या मॅनिक्युअरनंतर अमेरिकन महिलेस झाला कर्करोग!

नखांच्या मॅनिक्युअरनंतर अमेरिकन महिलेस झाला कर्करोग!

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणारी ग्रेस गार्सिया नखांच्या मॅनिक्युअरसाठी गेली होती, जिथे तिच्या नखांना एका टूलच्या मदतीने योग्य आकार देण्यात आला. नंतर त्याठिकाणी फोड येत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. तपासणी केली असता महिलेला समजले, की तिला त्वचेचा कर्करोग झाला आहे. मॅनिक्युअर केल्यानंतर महिलेच्या लक्षात आले की तिच्या बोटाला जखम झाली होती आणि नखं सुरू होतात तिथल्या पातळ त्वचेच्या वर्तुळावर एक फोड तयार झाला होता. जेव्हा महिलेच्या उजव्या बोटावरचा हा फोड तीन महिने पूर्ण बरा झाला नाही, तेव्हा तिला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले.

यानंतर ती त्वचारोग तज्ज्ञांकडे पोहोचली. जिथे डॉक्टरांनी तिला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. यात गार्सियाला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजेच त्वचेच्या कर्करोगाचा नॉन-मेलेनोमा प्रकार असल्याचे निदान झाले. गार्सियावर डॉ. टिओ सोलेमानी यांनी उपचार केले होते. त्यांनी हे उघड केले की कर्करोग ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (कझत) होतो आणि मॅनिक्युअरमुळे कर्करोग विकसित झाला असावा. एचपीव्हीमुळे नखांचा कर्करोग दुर्मीळ असला तरी आता त्याची प्रकरणे वाढत आहेत, असेही या तज्ज्ञाने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news