‘या’फळांच्या सालीही असतात गुणकारी | पुढारी

‘या’फळांच्या सालीही असतात गुणकारी

नवी दिल्ली : फळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते हे आपल्याला माहीत आहे. मात्र, फळांच्या सालीचाही खूप फायदा असतो, हे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे फळांच्या साली फेकून दिल्या जातात. फळांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि ते आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. त्याचप्रमाणे फळांच्या सालीमध्येही भरपूर पोषक तत्त्वांचा खजिना असतो. हा खजिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. आपण अनेकदा फळे खातो आणि त्याची साले फेकून देतो. आता या फळांची साल फेकून देऊ नका. त्याचे फायदे जाणून घ्या.

टरबुजाच्या सालीमध्ये भरपूर पोषक असतात. त्यामुळे पोट भरते आणि भूक नियंत्रित ठेवण्याचे काम होते. टरबुजाची साल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. केळीच्या सालीमध्ये असलेली पोषक तत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये फायबर आणि अमिनो अ‍ॅसिडस् मुबलक प्रमाणात आढळतात.

केळीची साल डोळ्यांसाठी फायदेशीर असते. ती खाल्ल्याने डोळ्यांचा संसर्ग दूर होण्यास मदत होते. काही लोक पेर अर्थात नाशपाती सोलून खातात. हे फळ सालीसह खाणे अधिक फायदेशीर ठरते. पेरच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. हे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. चिकू खायला चविष्ट आहे. आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. चिकूची साल देखील पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते.

यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि पोटॅशियमसारखे गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पेरू सालीशिवाय खाणे अजिबात योग्य नाही. याच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंटस् आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. लिंबाच्या सालीमध्ये असलेले पोषक तत्त्व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. लिंबाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये असलेले गुणधर्म कर्करोगापासून बचाव करण्यासही मदत करतात.

Back to top button