बर्फाचा सर्वात मोठा भूलभुलैया! | पुढारी

बर्फाचा सर्वात मोठा भूलभुलैया!

लंडन : हिवाळ्यात अनेक देशांमध्ये बर्फाच्या कलाकृती किंवा इमारती बनवल्या जात असतात. चीनच्या हार्बिन शहरात तर दरवर्षी अशी बर्फाची नगरीच बनवली जाते. त्यामध्ये बर्फाचे महाल व अनेक भव्य कलाकृतींचा समावेश असतो. आता पोलंडमध्ये बर्फापासून मोठा भूलभुलैया बनवण्यात आला आहे.

सोबतचे छायाचित्र पोलंडमधील जॅकोपेन येथील स्नोलँडिया विंटर थीम पार्कचे आहे. तेथे जगातील सर्वात मोठा बर्फाचा भूलभुलैया तयार केला आहे. यासोबत बर्फाचा 14 मीटर उंच महालही तयार केला आहे. हा 3000 चौ. मीटर क्षेत्रात तयार आहे. तो तयार करण्यासाठी कलाकारांसह 50 कामगारांना एक महिना लागला. यात बर्फाच्या 60 हजार ब्लॉकचा वापर केला आहे. रात्री रंगीत प्रकाशझोताने संपूर्ण परिसर उजळून निघतो, जो एखाद्या स्वप्नरंजनाच्या पुस्तकासारखा दिसतो. भूलभुलैया अन् बर्फाच्या अन्य कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक फेब्रुवारीपर्यंत पोहोचू शकतात. बर्फाचा असा भूलभुलैया कॅनडातील मोनीतोबात तयार केला आहे.

Back to top button